AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मान’ ठेवा… सुंदर… मानेवरील काळसरपणा घालवायचाय?; फॉलो करा हे घरगुती उपाय

Home Remedies To Clean Black Neck : मानेवर काळे डाग जमा झाले असतील तर ते साफ करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. ते नैसर्गिक पद्धतीने त्वचा उजळ आणि स्वच्छ करतात आणि त्वचेवर पुरळ वगैरे येऊ देत नाहीत.

'मान' ठेवा... सुंदर... मानेवरील काळसरपणा घालवायचाय?; फॉलो करा हे घरगुती उपाय
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 22, 2023 | 3:18 PM
Share

नवी दिल्ली : जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा (skin) चांगली असेल पण मान काळवंडलेली (blackness on neck) असेल, त्यावर डाग असतील त्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते. काहीवेळा त्वचेची चांगली काळजी न घेतल्याने ही समस्या उद्भवते, तर कधी खराब आरोग्य किंवा औषधांच्या सेवनामुळे हा त्रास होऊ शकतो. सूर्यप्रकाश, प्रदूषण इत्यादींमुळे त्वचेवर गडद ठिपके तयार होतात. त्वचेची काळजी न घेतल्याने किंवा सूर्यप्रकाश इत्यादींमुळे जर तुमची मान काळी झाली असेल तर तुम्ही साध्या घरगुती उपायांच्या (home remedies) मदतीने काळ्या मानेची समस्या दूर करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

मानेच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

बटाटा

बटाट्यामध्ये त्वचा उजळणारे नैसर्गिक तत्व आढळते, ज्याच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा सहज दूर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही उन्हामुळे काळी झालेली मान देखील स्वच्छ करू शकता. यासाठी बटाट्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस टाकून मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा धुवा. फरक दिसून येईल.

ओट्स

ओट्समध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. हे त्वचा स्वच्छ करण्यास, तसेच त्वचेला पोषण देण्यास व ती मऊ करण्यास मदत करते. दोन चमचे ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून त्यात टोमॅटोचा रस घाला. आता ते त्वचेवर लावा. हळूहळू तुमची त्वचा स्वच्छ होईल.

संत्र्याचे साल

संत्र्याच्या सालीमध्ये त्वचा उजळवण्याचे गुणधर्म देखील असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. संत्र्याची साल दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता ते मानेवर नीट लावा. 15 मिनिटांनंतर तुम्ही ते धुवा. त्वचा स्वच्छ होण्यास सुरवात होईल.

कोरफड

कोरफडीच्या मदतीने तुम्ही काळी मान नीट स्वच्छ करू शकता. त्यात एलोइन डिपिग्मेंटिंग आढळते ज्यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. कोरफडीचे पान घेऊन त्यातील गर घ्या काढून घ्या. हा ताजा रस मानेवर लावा, आणि 15 मिनिटांनंतर ते धुवा. किंवा तुम्ही ते जेल त्वचेवर रात्रभर ठेवू शकता.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...