Amazon Flipkart Festive Sale: फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट, फक्त ‘हे’ 3 ट्रिक्स ठेवा लक्षात

अनेक बँका आणि पेमेंट अ‍ॅप्स सणासुदीच्या दिवसांमध्ये खास UPI ऑफर लाँच करत आहेत. जसे की Amazon Pay UPI वापरून पेमेंट केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळवू शकतो. तर अशा काही टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकते.

Amazon Flipkart Festive Sale: फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट, फक्त हे 3 ट्रिक्स ठेवा लक्षात
You will get extra bumper discounts in the festival sale, just keep these 3 tricks in mind
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Oct 01, 2025 | 12:28 PM

Amazon आणि Flipkart वरील फेस्टिव्हल सेल सुरू झालेला आहे. या फेस्टिव्हल सेल दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोनपासून ते टेलिव्हिजन आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर लक्षणीय सूट मिळत आहे. मात्र योग्य पेमेंट पद्धत निवडल्याने या डीलवर ग्राहकांना पैश्याची आणखी बचत करता येऊ शकते. बँक ऑफर्स, UPI आणि वॉलेट कॅशबॅकचे एकत्रित फायदे हजारो रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. फेस्टिव्हल सेलमध्ये बचत करण्यासाठी सवलती तसेच पेमेंट ऑफर देखील आहेत. UPI, क्रेडिट कार्ड आणि वॉलेट वापरून कॅशबॅक कसा मिळवायचा ते आपण आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

UPI व्यवहाराद्वारे मोठी बचत

अनेक बँका आणि पेमेंट अॅप्स सणासुदीच्या दिवसांमध्ये खास UPI ऑफर लाँच करत आहेत. जसे ऑनलाईन शॉपिंग करताना Amazon Pay UPI वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 250 रूपयापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. फोनपे किंवा पेटीएम UPI वापरून फ्लिपकार्टवर व्यवहार केल्यास अतिरिक्त सवलती देखील दिल्या जातात. लहान व्यवहारांवर देखील इन्स्टंट कॅशबॅक उपलब्ध आहे.

क्रेडिट कार्ड ऑफरचा मोठा फायदा

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज आणि अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँक सारख्या प्रमुख बँकांचे क्रेडिट कार्ड 10% पर्यंत त्वरित सवलत देत आहेत. याव्यतिरिक्त, अनेक बँकांनी ईएमआय व्यवहारांवर नो-कॉस्ट ईएमआय आणि बोनस कॅशबॅक देखील दिला आहे. योग्य बँक कार्ड वापरून, ग्राहक मोठ्या खरेदीवर हजारो रुपयांपर्यंत बचत करू शकतात. विशेषतः, फ्लिपकार्ट आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डसह प्रत्येक व्यवहारावर 5% कॅशबॅक देते. एचडीएफसी आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर अमेझॉन देखील लक्षणीय कॅशबॅक देत आहे.

वॉलेट आणि प्रीपेड ऑफर

पेटीएम वॉलेट, अमेझॉन पे बॅलन्स आणि फोनपे वॉलेट वापरून पेमेंट केल्यावर ग्राहकांना कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स मिळत आहेत. काही ऑफर्समध्ये त्यांच्या वॉलेट बॅलन्सचा वापर करून पेमेंट केल्यास त्यांच्या पुढील खरेदीवर अतिरिक्त सूट देखील दिली जाते. या प्रीपेड वॉलेट ऑफर्सचा वापर केल्याने ग्राहकांना केवळ या सेल दरम्यानच नव्हे तर भविष्यातील खरेदीसाठी देखील फायदा होऊ शकतो.