पाकिस्तान सोडा, या देशात नाही राहत एकही भारतीय, कारण वाचून बसेल धक्का

Zero Indian Population: या देशात एकही भारतीय नागरिक राहत नाही, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पाकिस्तानमध्ये भारतीय नागरीक राहत नाही. दोन्ही देशात एकमेकांचे नातेवाईक आहेत. पण पाकिस्तानच नाही तर या देशातही भारतीय माणूस राहत नाही. कारण तरी काय?

पाकिस्तान सोडा, या देशात नाही राहत एकही भारतीय, कारण वाचून बसेल धक्का
एकही भारतीय वास्तव्याला नाही
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 10, 2026 | 5:09 PM

Zero Indian Population: अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते दुबईतील आलिशान बुर्ज खालिफापर्यंत भारतीय समाज हा जगातील कानाकोपऱ्यात वसरलेला आहे. तो त्या भागात लोकप्रिय आहे. भारतीय लोक मेहनतीने आणि प्रतिभाने नाव काढत आहेत. पण जगाच्या पाठीवर असे देश आहे. जिथं भारतीय माणूस वसलेला नाही. राहत नाही. या देशात भारतीयांचं प्रमाण जवळपास नाहीच. भौगोलिक परिस्थिती, कडक कायदे आणि कमी लोकसंख्या यामुळे या देशात भारतीय लोक राहत नाही. या देशात भारतीय लोक राहत नाहीत.

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश होता. येथील लोकसंख्या मुख्यत: कॅथेलिक आहे. ही लोकसंख्या कॅथेलिक चर्चचे अधिकारी आणि स्वीस गार्डसपर्यंत मर्यादीत आहे. येथे जन्माच्या आधारावर कोणाला नागरिकता मिळत नाही. उलट येथे कामाच्या आधारावर इथं लोकांना काम मिळतं. इथं भारतीय पादरी, नन आणि आध्यात्मिक काम करणारे हे काही काळ येतात. पण इथं या देशात एका भारतीयाचं घर नाही.

सॅन मॅरिनो

इटलीच्या मध्यभागी जगातील सर्वात जुने गणराज्य सॅन मॅरिनो आहे. येथे अप्रतिम वास्तूकला आणि शांत वातावरण आहे. इथे अनेक भारतीय फिरायला, पर्यटनासाठी जातात. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) ताज्या आकड्यावारीनुसार येथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संख्या शून्य आहे. येथे राहण्याचे नियम अत्यंत कडक आहे. तर भौगोलिक परिस्थिती पण भारतीयांना इथं वास्तव्य करण्यास थांबवते.

तुवालु

प्रशांत महासागरातील तुवालू जगातील सर्वात दूर आणि कमी लोकसंख्या असलेला एक देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ एका छोट्या गावा इतकंच आहे. भौगोलिक परिस्थितीच नाही तर मर्यादीत सोयी-सुविधा यामुळे इथं एकही भारतीय वास्तव्याला नाही.

बुल्गारिया

बाबा वेंगा या भविष्यकर्तीचा हा देश आहे. या देशातही भारतीय राहत नाही असा दावा करण्यात येतो. पण काही मीडियातील वृत्तानुसार, या देशात जवळपास 800-900 भारतीय राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपातील काही देशात भारतीयांची संख्या कमी आहे.