मुंबईकरांनो सावधान, आफ्रिकेतून 19 दिवसात एक हजार लोक मुंबईत, ट्रेसिंग सुरू

| Updated on: Nov 29, 2021 | 5:34 PM

दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हायरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबईकरांच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत.

मुंबईकरांनो सावधान, आफ्रिकेतून 19 दिवसात एक हजार लोक मुंबईत, ट्रेसिंग सुरू
Aaditya Thackeray
Follow us on

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हायरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबईकरांच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत. या लोकांची ट्रेसिंग सुरू करण्यात आली आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूने हाहा:कार उडवला त्या देशातून मुंबईत एक हजार लोक आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 10 नोव्हेंबरपासून मुंबईत 1 हजारच्या आसपास लोक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना ट्रेस केलं जातं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मास्क घालणं बंधनकारकच

ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स सगळ्यांच्या बैठका पार पडल्या. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काळजी काय घ्यायची यासाठी ही बैठक होती. मुंबईत 102 टक्के लसीकरण झालं आहे. 72% लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन डोस सर्वांनी घेणे गरजेचे आहे. दोन डोसमधील कालावधी कमी करण्याची केंद्र सरकारकडे विनंती करण्यात येणार आहे. मात्र, डोस घेतल्यानंतरही मास्क घालणं बंधनकारक आहे, असं आदित्य यांनी सांगितलं.

काही देशात चौथी लाट

आम्ही मेडिकल सुविधांचा आढावा घेणार आहेत. काही देशात कोरोनाची चौथी लाट आली आहे. आपल्याकडे अशी वेळ येऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. केंद्राकडून आज नियमावली आली. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पर्यटनाला अडवलं नाही

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. दुकानदारांबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत अजून पुनर्विचार करण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पर्यटनासाठी कुणालाही अडवण्यात येत नाहीये. पण काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत संशयित रुग्ण

दरम्यान, ठाकरे सरकारमधील एक मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनचे संशयित रुग्ण असल्याचं विधान केलं आहे. मुंबईत सध्या एक संशयित रुग्ण असून त्याची माहिती घेतली जात आहे. तसेच केंद्र सरकारच्या नियमावलीची वाट न पाहता काळजी घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

New delhi : शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाईसह राज्यसभेचे 12 खासदार निलंबीत, गेल्या अधिवेशनातल्या गोंधळामुळे कारवाई

संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल

Karjat Election : कर्जत नगर पंचायत निवडणुकीवरुन पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना! कोण बाजी मारणार?