Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला परीक्षा? वाचा सविस्तर

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला परीक्षा? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 3:44 PM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. यंदाही ऐन परीक्षेच्या वेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्याने यंदा तरी परीक्षा होणार की नाही? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने परीक्षांबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.  शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

 

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या या तारखा आहेत, आधीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लेखी आणि तोंडी परीक्षेचा तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे.

बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षांचे वेळापत्रक

कसे असेल परीक्षांचे नियोजन?

ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.

TET scam 2018 | टीईटी परीक्षा  घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?

हजेरीपटावर सोमवारच्या सह्या रविवारीच केल्या, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं!

Ravichandran Ashwin : ‘कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं’