
आता आपण आनंदी आणि उत्साही आयुष्य जगत आहोत, पण पुढच्या क्षणी काय होईल काहीही सांगता येत नाही. आज आपल्यासोबत असलेला व्यक्ती उद्या आपल्यासोबत असेल की नाही… याबद्दल काही सांगता येत नाही.. असंच एका 14 वर्षांच्या मुलासोबत झालं. ज्यामुळे आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरात एकच खळबळ माजली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाचं क्रिकेट खेळताना निधन झालं आहे. क्रिकेट खेळताना निधन कसं झालं? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. क्रिकेट खेळताना मुलाच्या अवघड जागी बॉल लागला आणि त्याचं निधन झालं. रुग्णालायत दाखल करताच, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
धक्कादायक वास्तव म्हणजे. मुलाच्या निधनाच्या दोन महिन्यांआधी त्याच्या वडिलांचं देखील निधन झालं. एकाच घरात दोन महिन्यात दोन जणांचा मृत्यू… फार दुःखद घटना आहे. वडील आणि मुलाच्या निधनानंतर परिसरातील लोकांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. क्रिकेट खेळत असताना चेंडू छातीला लागून 14 वर्षीय प्रणव अनिल आगलावे या मुलाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर येथी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास प्रणव काही मित्रांसोबत भिवापूर महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना अचानक चेंडू त्याच्या छातीला लागल्याने तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झालेला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून प्रणवला मृत घोषित केलं.
वेदनादायी गोष्ट म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी प्रणव याचे वडील अनिल आगलावे यांचं निधन झालं होतं. दोन महिन्यांनंतर प्रणव याचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर पिता पुत्राच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रणव याच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रणव आगलावे हा भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववी इयत्तेत शिकत होता. अवघ्या 14 व्या वर्षी प्रणव आणि दोन महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांच निधन झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.