
पिंपरी चिंचवडमध्ये दोन अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका अपघातात एका कारने दुचाकीस्वाराला उडवले आहे. तर तर दुसऱ्या अपघातात एक वाळूचा डंपर उलटला आहे. यातून एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. या दोन्ही अपघातांचे व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. या दोन्ही अपघातांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एका दुचाकी आणि कारच्या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात भरधाव दुचाकी चालक भरधाव कारला धडकतो. त्याच डोकं कारच्या समोरील काचेवर जोरात आदळलं आहे. यामुळे काच फुटली. तसेच दुचाकी काही अंतरापर्यंत फरपटत गेल्याचे दिसत आहे. डोक्यात हेल्मेट असल्याने दुचाकीस्वार बचावला आहे. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. तसेच या अपघातात दुचाकी आणि कार च मोठं नुकसान झालं आहे. सध्या हा सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच बाईक चालवताना हेल्मेट किती महत्त्वाचं आहे हे यातून समोर आलं आहे.
दुसऱ्या अपघातात एक वाळूचा डंपर उलटल्याचे दिसत आहे. हा डंपर रस्त्यावरून जात होता. त्यावेळी एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला दुचाकीजवळ उभा होता. मात्र वाळूची वाहतूक करणाऱ्या या डंपरचे चाक खड्ड्यात अडकले अन डंपर पलटी झाला.हे पाहून दुचाकीस्वाराने गाडी सोडून धाव घेतली. त्याने प्रसंगावधान दाखवल्यानं तो यातून थोडक्यात बचावला. नंतर चालक आणि क्लिनर खिडकीतून खाली उतरल्याचे दिसत आहे. या घटनेचाही सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
या अपघातातून बचावलेल्या गोविंद गायकवाड या तरुणाने सांगितले की, ‘मी गाडीच्या कामासाठी गॅरेजवर आलो होतो. काम झाल्यानंतर मी निघण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी समोरून डंपर आला, त्याला जागा देण्यासाठी मी साईटला थांबलो होतो. मात्र डंपरचा मागचा टायर ड्रेनेजमध्ये खचला. मला लक्षात आलं की हा डंपर पलटी होणार आहे, त्यामुळे मी गाडी सोडून बाजूला उडी मारली. त्यानंतर हा डंपर दुचाकीवर पटली झाला. दरम्यान या खड्ड्याबद्दल महापालिकेकडे तक्रार केली होती मात्र महापालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.’