
पुणे : भटक्या कुत्र्यांनी प्राणी संग्रहालयात घुसून 4 हरणांचा फडशा पाडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयात (Katraj Zoo) घडला आहे. भटक्या कुंत्र्यानी हरणांचा कळप असलेल्या खंदकात घुसून 4 हरणांवर हल्ला केला. यामध्ये 2 नर आणि 2 मादी हरणांचा मृत्यू झाला असून 1 हरिण जखमी झाले आहे. या घटनेनंतर हल्ला करणारे चारही भटके कुत्रे भूल देऊन पकडण्यात आले आहेत. घडलेल्या या प्रकारमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (4 deer has been killed by dfour dogs in Pune Katraj Zoo)
मिळालेल्या माहितीनुसार प्राणी संग्रहालयाच्या कात्रज गावठाणाजवळील पत्रे व्यवस्थित लावलेले नाहीत. या उचकलेल्या पत्रांतून भटक्या कुत्र्यांनी प्राणी संग्रहालयात प्रवेश केला. त्यानंतर प्राणी संग्रहालयातील खंदकाकडे आपला मोर्चा वळवत या कुत्र्यांनी हरणांवर हल्ला केला. हा हल्ला एवढा गंभीर स्वरुपाचा होता, की यामध्येत तब्बल 4 हरणांचा मृत्यू झाला. तसेच, 1 हरिण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले आहे. मृत्यू झालेल्या हरणांमध्ये 2 नर असून 2 माद्या आहेत.
हरणांवर हल्ले करणारे भटके कुत्रे अत्यंत चवताळलेले होते. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी या कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कर्मच्याऱ्यांच्या हाती लागले नाहीत. त्यानंतर प्राणी संग्रहालयाकूडन डॉग स्कॉडला पाचरण करण्यात आलं. डॉग स्कॉडने या कुत्र्यांना भूल देऊन त्यांना पकडले.
दरम्यान, या प्राणी संग्रहालयात एकूण 34 हरिण आहेत. या हरणांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेट देतात. तसेच या ठिकाणी इतही प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. कुत्र्यांनी हल्ला करुन तब्बल 4 हरणांचा फडशा पाडल्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा घटना आगामी काळात घडू नयेत यासाठी वेळीच काहीतरी ठोस उपाय करण्याची मागणी प्राणी प्रेमींकडून केली जात आहे.
मोठी बातमी: भाजप आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांची नोटीस https://t.co/KxKkcCcmve #PrasadLad #BJP #EOW
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संंबंधित बातम्या :
(4 deer has been killed by dfour dogs in Pune Katraj Zoo)