मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव; पुण्यात सहा तासांचा थरार!

मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव; पुण्यात सहा तासांचा थरार!

जंगलातून वाट चुकून माणसांच्या सिमेंटच्या जंगलात आलेल्या एका जखमी रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीन जीव घेतला.

भीमराव गवळी

|

Dec 09, 2020 | 6:46 PM

पुणे: जंगलातून वाट चुकून माणसांच्या सिमेंटच्या जंगलात आलेल्या एका जखमी रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीन जीव घेतला. 700 ते 800 किलो वजनाचा हा रानगवा अंदाजे 3 ते 4 वर्षाचा होता. नैसर्गिक अधिवास संपत आल्यानं मानवी वस्तीत आलेल्या या वन्यप्राण्यांना सहानुभूतीने वागणूक देण्याची आवश्यकता असते. पण हुल्लडबाजी करणाऱ्या अतिउत्साही नागरिकांमुळे आज एका रानगव्याला जीव गमवावा लागलाय. (Indian bison died in pune, who spotted in residential society kothrud)

सकाळी आठच्या सुमारास हा जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा विचित्र प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. या गव्याची आज दिवसभर धरपकड सुरू होती. त्यामुळे लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. त्यातच वनखाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे तो आणखीनच बिथरला. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्धही केले. पण बिथरलेल्या या गव्याचा अखेर मृत्यू झाला.

रस्त्यावर रक्ताचा सडा

नागरिकांनी गर्दी करून गोंगाट केल्याने हा जखमी गवा अधिकच बिथरला. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. तशा अवस्थेत तो सैरभर पळत राहिला. महात्मा सोसाटीतून हा गवा पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उजव्या भुसारी कॉलनीतील इंदिरा-शंकर सोसायटीत आला. या सोसायटीच्या पार्किंग शेजारी हा गवा बसून राहिला. पण जमाव जमा झाल्याने त्याने पार्किंगमधील कारला शिंगांनी धडका दिल्या. या गव्याने कारचा टायर पंक्चर केला. गव्याने धडक दिल्याने या कारचं मोठं नुकसान झालं.

गळ्यात दोर अडकवला

यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या गव्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यात मोठा दोर टाकला. मात्र, तरीही त्याला पकडणं अशक्य झालं होतं. गळ्यात दोर टाकल्यानंतरही हा गवा सैरभर पळत होता. दुसरीकडे बघ्यांनी आणखीनच गर्दी करत गोंगाट केला. तसेच या गव्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे हा गवा आणखीनच भांबावला आणि सैरावैरा पळत सुटला. त्यानंतर पौड रस्त्यावरील मध्यवर्ती भागातल्या चांदणी चौकात हा गवा आल्याने एकच गोंधळ उडाला. तिथल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसला. नंतर सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आल्यावर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले.

दोरखंड आणि डोळ्यावर कपडा

या गव्याला बेशुद्ध करण्यापूर्वी त्याच्या गळ्यात दोरखंड टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोळ्यावर कपडा टाकण्यात आला आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. जमाव बघून गवा बिथरू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर त्याला कंटेनरच्या सहाय्याने उचलून गाडीत टाकून नेण्यात आले. मात्र, जखमी आणि आधीच बिथरलेल्या या गव्याचा मृत्यू झाला.

कोल्हापूर अभयारण्यातून आला?

हा गवा पुण्यात कसा आला? याचं रहस्य अजून कायम आहे. कोल्हापूरच्या अभयारण्यातून तो पुण्यात आला असावा अशी चर्चा आहे. मात्र, एवढा लांबचा प्रवास करून आलेला गवा कुणालाच कसा दिसला नाही? याबाबतही कुतुहूल निर्माण झालं आहे. (Indian bison died in pune, who spotted in residential society kothrud)

सातशे ते आठशे किलो वजन

हा गवा अत्यंत शक्तिशाली होता. तब्बल 700 ते 800 किलो वजनाचा हा गवा होता. जंगलात राहणारा हा महाकाय प्राणी पुण्यात आल्याने आज दिवसभर पुणेकरांची या गव्याला पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

ट्रँग्युलाईज केलं नसतं तर?

अत्यंत शक्तीशाली असलेल्या या गव्याला पकडण्यासाठी त्याला ट्रँग्युलाईज करण्यात आले. त्यानंतर त्याला बेशुद्ध केल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या गव्याला ट्रँग्युलाईज केलं नसतं तर मोठा अनर्थ घडू शकला असता, असं वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Indian bison died in pune, who spotted in residential society kothrud)

संबंधित बातम्या:

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

ई-बाईक सेवा देणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार!

(Indian bison died in pune, who spotted in residential society kothrud)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें