कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली आहे. | Pune bison

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:42 AM

पुणे: एरवी सांस्कृतिक आणि राजकीय कारणांमुळे कायम प्रकाशझोतात असणारे पुणे बुधवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. पुण्याच्या कोथरुडमध्ये एक रानटी गवा फिरताना आढळून आला आहे. येथील महात्मा सोसायटीच्या परिसरात या गव्याचा वावर आहे. (Wild animals in Pune)

कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या रानटी गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरलेला दिसत आहे. वनविभागाला या प्रकाराची वर्दी देण्यात आली असून थोड्याचेवळात त्यांचे पथक याठिकाणी दाखल होईल.

मात्र, कोथरूडसारख्या शहरी भागात रानटी गवा आलाच कसा, असा बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता वनविभागाने या गव्याला पकडल्यानंतर कदाचित या सगळ्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील रस्त्यांवरही दिसले होते जंगली प्राणी

यापूर्वी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतही जंगलालगत असणाऱ्या परिसरात जंगली प्राणी आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी नागरिक घरात बंदिस्त झाल्याने रस्त्यांवरील वर्दळ अचानक थांबली होती. त्यामुळे मुंबईत कधी नव्हे ती इतकी चिडीचूप शांतता अनुभवायला मिळत होती.

परिणामी जंगलातील प्राणी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना आढळून आले होते. दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर या काळात मोर अनेकदा स्वच्छंदपणे विहार करताना दिसले होते. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही हरिणांचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत होते. याशिवाय, मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे फिरताना आढळून आले होते.

संबंधित बातम्या:

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू

(Wild animals in Pune)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.