AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्र किनारी कचऱ्यामध्ये दिसली ‘जलपरी’, फोटो पाहून नेटकरी घाबरले; वाचा संपूर्ण सत्य

मानवी दुर्लक्षामुळे नद्यांमध्येच नाही तर नद्यांच्या काठावरही कचऱ्याचे मोठे ढिग पाहायला मिळतात. या कचऱ्यामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर अतिशय वाईट दुष्परिणाम होत आहे.

समुद्र किनारी कचऱ्यामध्ये दिसली 'जलपरी', फोटो पाहून नेटकरी घाबरले; वाचा संपूर्ण सत्य
| Edited By: | Updated on: Jan 06, 2021 | 10:43 PM
Share

जकार्ता (इंडोनेशिया): नद्या आणि समुद्रांमध्ये सततच्या वाढणाऱ्या प्रदूषणामुळे सागरी प्राण्यांना होणारा धोकाही वाढत आहे. मानवी दुर्लक्षामुळे नद्यांमध्येच नाही तर नद्यांच्या काठावरही कचऱ्याचे मोठे ढिग पाहायला मिळतात. या कचऱ्यामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर अतिशय वाईट दुष्परिणाम होत आहे. खरंतर, याचा थेट परिणाम प्राणी आणि सागरी प्राण्यांना होतो. यासंबंधी अनेक व्हायरल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात. (instagram user highlights the sad reality of marine pollution share mermaid photo on bali beach)

आताही असाच एक फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. कचर्‍याने भरलेल्या नदीच्या काठी एक जलपरी पडल्याचा हा फोटो आहे. स्वत: ला Ocean Advocate म्हणून घेणाऱ्या एका वापरकर्त्याने ट्विटरवर हा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक जलपरी बालीच्या Kuta Beach वर पडलेली आहे.

खरंतर, हा फोटोमध्ये त्याने स्वत: जलपरीचा वेष परिधान करून कचऱ्यासोबत फोटो काढला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कचराही वाढत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांमध्ये अशा प्रकारे कचऱ्याचं प्रमाण वाढलं तर सागरी प्राणी नक्कीच एक दिवस मानवी वस्तीमध्ये येतील, असं या फोटोतून सूचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2021 च्या पहिल्या तीन दिवसांत बालीच्या मध्यभागी सुमारे 80 टन कचरा पसरला होता. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीने हा फोटो क्लिक केला त्याने ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने आणि स्वयंसेवकाच्या मदतीने हा फोटो काढला आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता केवढया मोठ्या प्रमाणात कचरा परिसरात जमा झाला आहे. यामुळे वेळीच कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणं आणि उघड्यावर कचरा न फेकण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. (instagram user highlights the sad reality of marine pollution share mermaid photo on bali beach)

इतर बातम्या – 

दोन विषारी सापांमध्ये झाली जबरदस्त Fight, एकमेकांना पिळा घालून केले वार; VIDEO व्हायरल

पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL

(instagram user highlights the sad reality of marine pollution share mermaid photo on bali beach)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ