रतन टाटांच्या माणुसकीला सलाम, आजारी कर्मचाऱ्याच्या भेटीसाठी थेट पुण्यात

मागील दोन वर्षांपासून आजारी असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा हे थेट मुंबईहुन पुण्यात त्यांच्या घरी पोहोचले.

रतन टाटांच्या माणुसकीला सलाम, आजारी कर्मचाऱ्याच्या भेटीसाठी थेट पुण्यात
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 5:09 PM

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही असंच काळाजाला स्पर्श करणारी घटना समोर आली आहे. खरंतर, रतन टाटा त्यांच्या कर्मचार्‍यांची खूप काळजी घेतात. मागील दोन वर्षांपासून आजारी असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा हे थेट मुंबईहुन पुण्यात त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी टाटा यांनी संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या या क्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. (ratan tata reached pune from mumbai just to meet his former employee)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हे कर्मचारी आजारी होते. विषेश म्हणजे आजारी कर्मचारी आता रतन टाटा यांच्यासाठी काम करत नाही. असं असुनही रतन टाटा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याची आठवण ठेवली. कर्मचाऱ्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्याच सोसायटीत रहाणाऱ्या एका व्यक्तिने फोटो काढून ट्विटरवर शेअर केला आहे. टाटांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

खरंतर, रतन टाटा यांचे असे अनेक क्षण आहेत. जिथे ते नेहमी माणुसकी जपताना दिसतात. टाटाची सगळ्यात लोकप्रिय कार टाटा सुमोचं नाव ठेवण्यामागेही खास रंजक कथा आहे. माजी एमडी सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून टाटा सुमोचं नाव ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या नावाची पहिली आणि दुसरी अक्षरे वापरुन सुमो असं नाव पडलं. टाटा कंपनीसाठी हे नाव खूपच लकी होतं. कारण, टाटा सुमोची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. रतन टाटा यांच्या कर्मचार्‍यांशी असलेल्या नात्याचं हे एक अनोखं उदाहरण आहे.

कर्मचाऱ्यांना दिला होता ‘बेस्ट फेल आयडिया पुरस्कार’

गेल्या काही दिवसांआधी टाटा मोटर्सचा व्यवसाय तोट्याच सुरु असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे कर्मचार्‍यांमध्येही उत्साह डगमगला होता. यावेळी टाटांनी एक अनोखा प्रयोग केला. कंपनीत त्यांनी ‘बेस्ट फेल आयडिया’ या पुरस्काराचं आयोजन केलं. संपूर्ण वर्षामध्ये जो कर्मचारी अयशस्वी ठरला त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार होता. पण यामगे कर्मचाऱ्यांना प्रोस्ताहन देणं हा महत्त्वाचा हेतू होता.

26/11 हल्ल्यातील कर्मचार्‍यांनाही केली मदत

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा टाटा समूहाचे अनेक दहशतवादीही यामध्ये जखमी किंवा मृत झाले होते. त्या वेळीही रतन टाटा हे त्यांच्या कर्मचार्‍यांना भेटण्यासाठी घरी गेले होते. इतकंच नाही तर त्यांना सर्वतोपरी मदत केली होती. भविष्यात त्यांचे सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं होतं. (ratan tata reached pune from mumbai just to meet his former employee)

संबंधित बातम्या – 

डोकं लावून स्वत:च केली वीजनिर्मिती, या शेतकऱ्याचा फोटो व्हीव्हीएस लक्ष्मणकडून शेअर

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!

(ratan tata reached pune from mumbai just to meet his former employee)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.