डोकं लावून स्वत:च केली वीजनिर्मिती, या शेतकऱ्याचा फोटो व्हीव्हीएस लक्ष्मणकडून शेअर

सिदप्पा (Siddappa) नावाचा शेतकरी स्वत: वीजेचं उत्पादन करत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 5 Jan 2021
डोकं लावून स्वत:च केली वीजनिर्मिती, या शेतकऱ्याचा फोटो व्हीव्हीएस लक्ष्मणकडून शेअर

कर्नाटक : भारतात ‘जुगाड‘ हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो (Karnataka Farmer Design Unique Water Mill). याचा अर्थ म्हणज काहीतरी जोड-तोड करुन आपलं काम होईल असं काहीतरी करणे. या जुगाडचा वापर करुन भारतातील अनेक लोक असे कारनामे करतात ज्याचा कधी कोणी विचारही केलेला नसेल. अनेकदा यामुळे अनेक अशा गोष्टींची निर्मिती होते ज्याचा आपण विचारही करत नाही (Karnataka Farmer Design Unique Water Mill).

कर्नाटकातही एका शेतकऱ्याने असंच काहीतरी करुन दाखवलं आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिदप्पा (Siddappa) नावाचा शेतकरी स्वत: वीजेचं उत्पादन करत आहे. या शेतकऱ्याचा फोटो माजी भारतीय क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यानंतर या शेतकऱ्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिदप्पा त्याच्या घरच्यासाठी स्वत: विजेचं उत्पादन करत आहेत. सिदप्पा यांनी एका अशा वॉटर मिलची निर्मिती केली आहे ज्याच्या माध्यमातून ते 150 व्हॅट वीजेची निर्मिती करु शकतात.

जेव्हा त्यांच्या घराजवळील कालव्यातून पाणी वाहत असतं तेव्हा ते विजेची निर्मिती करतात. रिपोर्ट्सनुसार, सिदप्पा यांचं घर अत्यंत दुर्गम भागात आहे. त्यामुळे हुबळी इलेक्ट्र्कल सप्लाय कंपनी लिमिटेड तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सिदप्पा यांना आपण स्वत:च विजेची निर्मिती करावी अशी कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी मिळेल त्या गोष्टी जमवण्यास सुरुवात केली आणि त्यातून वॉटर मिलची निर्मिती केली.

सिदप्पा यांचा फोटो व्हायरल

सिदप्पा यांच्या या आयडियाने अनेक लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सिदप्पा यांचा फोटो शेअर केला. त्यासोबतच त्यांनी या फोटोला कॅप्शनही दिलं.

“आश्चर्यकारक, सिदप्पा नावाच्या एका शेतकऱ्याने स्वत: वॉटर मिल डिझाईन केली, ज्यातून विजेची निर्मिती होत आहे”, असं कॅप्शन व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिलं (Karnataka Farmer Design Unique Water Mill).

सिदप्पा यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक त्यांचं कौतुक करत आहेत. तसेच, हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचंही मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. या शेतकऱ्याचा फोटो शेअर करण्यासाठी नेटकरी व्हीव्हीएस लक्ष्मण यांचंही कौतुक करत आहेत.

Karnataka Farmer Design Unique Water Mill

संबंधित बातम्या :

Indian Railway | एक किमी अंतरासाठी ट्रेनला लागते ‘इतके’ डीझेल! वाचा ट्रेनच्या मायलेजविषयी…

अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त जाहीर, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून पतीला फोन… ‘तान्या जिवंत आहे’

‘पीछे तो देखो पीछे’ सांगणारा अहमद शाहचा नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस