‘पीछे तो देखो पीछे’ सांगणारा अहमद शाहचा नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

अहमदचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अहमद नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे (piche toh dekho famous kid Ahmad Shah viral video)

'पीछे तो देखो पीछे' सांगणारा अहमद शाहचा नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

मुंबई : सोशल मीडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल, याचा काहीच भरोसा नाही. सेलिब्रिटिंपासून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत कुणीही या माध्यमातून प्रसिद्ध होऊ शकतं. पाकिस्तानचा एक क्यूट मुलगा गेल्यावर्षी असाच काहीसा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. जगभरातील लाखो लोकांनी या मुलाचं कौतुक केलं होतं. या मुलाचं नाव अहमद शाह असं आहे. तो एका व्हिडीओत ‘पीछे तो देखो पीछे..’ असं बोलत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांना अहमद विषयी माहिती जाणून घ्यायची होती (piche toh dekho famous kid Ahmad Shah viral video).

अहमद जगप्रसिद्ध होऊन आता बरेच महिने झाले आहेत. त्याचा युट्यूब, फेसबूक किंवा ट्विटरवर कोणताही व्हिडीओ आला तर लोक तो आवर्जुन बघतात आणि शेअर करतात. आतादेखील अहमदचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अहमद नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे. या व्हिडीओत अहमदसोबत आणखी दोन लहान मुलंदेखील आहेत. दरम्यान, “नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या वर्षात परमेश्वर आपल्या आयुष्यात भरपूर आनंद घेऊन येवो”, असं अहमद व्हिडीओत म्हणत आहे.

या व्हिडीओत अहमद बोलत असताना त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लहान मुलाच्या हातात एक चॉकलेट कँडी आहे. मात्र, ती कँडी त्याच्या हातातून निसटते. व्हिडीओ सुरु असल्याने कँडी उचलू शकत नाही, असा भाव त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र, अखेर तो व्हिडीओ सुरु असताना कँडी उचलण्याचा निर्णय घेतो. चिमुकल्याची ही सर्व घालमेल कॅमेऱ्यावर एकदम चपखलपणे टिपली गेली आहे.

अहमद आणि दोन लहान मुलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत (piche toh dekho famous kid Ahmad Shah viral video).

ट्विटरवर ‘Aima Khosa’ नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास साडेपाच लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर 39 हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. तर सात हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Farmers’ Protest | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेतकऱ्यांना ‘ओपन सपोर्ट’, म्हणाले, ‘माझ्या बळीराजाला न्याय मिळायलाच पाहिजे’…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI