Farmers’ Protest | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेतकऱ्यांना ‘ओपन सपोर्ट’, म्हणाले, ‘माझ्या बळीराजाला न्याय मिळायलाच पाहिजे’…

शेतकरी आंदोलनाचा आज 40 वा दिवस आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे.

Farmers’ Protest | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेतकऱ्यांना 'ओपन सपोर्ट', म्हणाले, 'माझ्या बळीराजाला न्याय मिळायलाच पाहिजे'...

मुंबई : शेतकरी आंदोलनाचा आज 40 वा दिवस आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण, आज शेतकरी संघटना आणि सरकार (Farmers Government Meeting) यांच्यात परत एकदा बैठक होणार आहे. यामुळे आजचा दिवस हा शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. यासंदर्भात बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra)  यांनी एक ट्विट केले आहे. (Bollywood actor Dharmendra tweeted about the farmers’ movement)

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे केले की, “आज माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा, मी त्यासाठी प्रार्थना करतो.” यापूर्वीही धर्मेंद्र यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. मात्र, नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. परंतु त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट आधीच घेण्यात आले होते त्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले.

मध्यंतरी शेतकरी आंदोलनावर प्रियंकाने देखील एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिला ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलर्सचे म्हणणे होते की, प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहे आणि तिथे बसून भारतातील आंदोलनावर तिने बोलू नये आणि तिला तेथील शेतकऱ्यांचे दुःख काय माहिती आहे. प्रियंका चोप्राने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा. या तिने केलेल्या ट्विटवरूनच तिला ट्रोल केले जात होते.

संबंधित बातम्या : 

New Project | बाहुबलीच्या भल्लालदेवची ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री, ‘या’ सीरीजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

NCB कार्यालयात हजेरी लावून रिया चक्रवर्ती परतली, कोर्टाच्या ‘त्या’ आदेशाचं रिया-शौविककडून पालन

(Bollywood actor Dharmendra tweeted about the farmers’ movement)

Published On - 2:36 pm, Mon, 4 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI