AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त जाहीर, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून पतीला फोन… ‘तान्या जिवंत आहे’

अभिनेत्री तान्या रॉबर्ट्सचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र ती जिवंत असल्याचं आता समोर आलं आहे Tanya Roberts alive

अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त जाहीर, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून पतीला फोन... 'तान्या जिवंत आहे'
| Updated on: Jan 05, 2021 | 1:05 PM
Share

न्यूयॉर्क : आपली प्रिय पत्नीने जगाचा निरोप घेतला आहे, हा धक्का जड अंतःकरणाने स्वीकारत असतानाच त्याच्या दुःखावर नियतीने फुंकर घातली. ‘बाँड गर्ल’ म्हणून नावारुपास आलेली प्रख्यात हॉलिवूड अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स (Tanya Roberts) हिचं निधन झाल्याचं वृत्त रुग्णालयातून आलं. पती लान्स ओ’ब्रायनने (Lance O’Brien) तिच्या निधनाची वार्ता जाहीर केली, मात्र मुलाखत सुरु असतानाच त्याला तान्या जिवंत असल्याचा फोन आला. त्यावेळी, लान्सने रोखून धरलेल्या भावनांचा बांध फुटला आणि या सुखद बातमीनंतरही तो अक्षरशः धाय मोकलून रडू लागला. (Bond girl Tanya Roberts partner learns she is alive hours after reported dead)

“काय? तान्या जिवंत आहे?”

लान्स ओ’ब्रायन इन्साईड एडिशनसाठी सोमवारी सकाळी शूटिंग करत होता. इतक्यात अभिनेत्री तान्या रॉबर्ट्सवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातून त्याला फोन आला. फोनवर बोलता-बोलता लान्सचे हावभाव अचानक बदलले. “काय? तुम्ही मला आता सांगताय की ती जिवंत आहे?” असं म्हणत तो रडायला लागला. “आयसीयूमधून मला फोन आला… हॉस्पिटल प्रशासनं सांगतंय की ती जिवंत आहे” असं त्याने मुलाखतकर्त्याला सांगितलं. ‘डेलीमेल’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

रॉजर मूरसोबत बाँडपट गाजला

1985 मधील बाँडपट ‘अ व्ह्यू टू किल’ (A View To Kill) मध्ये अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स ही रॉजर मूरसोबत झळकली होती. रविवारी तान्याचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाल्याचं प्रेस रिलीजद्वारे जाहीर करण्यात आलं. ऐन ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला तान्या हॉलिवूड हिल्समधील राहत्या घरी बेशुद्ध पडली होती. कुत्र्याला फिरवून घरी आल्यानंतर तिची शुद्ध हरपली. तिला लॉस अँजेलसमधील सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेंटिलेटरवर होती.

‘मी तिच्या अखेरच्या क्षणी तिचा हात धरला होता. तिने डोळे उघडले. मी तिचे सुंदर डोळे अखेरचे पाहिले. तान्याचे डोळे सर्वात सुंदर होते’ अशा भावना पती लान्स ओ’ब्रायनने रविवारी तान्याच्या निधनाचं वृत्त सांगताना व्यक्त केल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजता मात्र रुग्णालयाने फोन करुन तान्या जिवंत असल्याचं कळवलं.

गोंधळ कोणी घातला?

नेमका गोंधळ कोणाचा झाला, याबद्दल कोणीही अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. तान्या जगण्याची कोणतीही आशा नाही, असं आपल्याला रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं लान्स म्हणाला होता. तान्याने डोळे उघडल्याचं आपण सांगूनही ती केवळ प्रतिक्षिप्त क्रिया असल्याचं स्टाफने सांगितलं, असंही लान्स म्हणाला होता.

संबंधित बातम्या :

विद्या बालनसोबत डर्टी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, खोलीत सापडला मृतदेह

(Bond girl Tanya Roberts partner learns she is alive hours after reported dead)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.