विद्या बालनसोबत डर्टी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, खोलीत सापडला मृतदेह

विद्या बालनसोबत डर्टी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, खोलीत सापडला मृतदेह

मुंबई : 2020 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वाईट केले आहे. बरेच अभिनेता आणि अभिनेत्री यांनी याच वर्षी जगाला निरोप देत गेले आहेत. 2020 अंतिम टप्प्यामध्ये असताना आणखीन एका अभिनेत्रीच्या निधनाची बातमी येत आहे. डर्टी चित्रपटात विद्या बालनबरोबर काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जीचे निधन झाले आहे. ती 33 वर्षांची होती. ती कोलकाताच्या जोधपुर पार्क भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Actress who worked with Vidya Balan in the movie Dirty dies)

आर्याचे पूर्ण नाव देबदत्ता बॅनर्जी असे होते. ती सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती. आर्याने तिची खोली आतमधून बंद केली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला आवाज दिले फोन केले मात्र, आतमधून कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली.
तिच्या घरातून पोलिसांनी काही औषधे आणि दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आर्याने डर्टी चित्रपटासोबतच ‘लव्ह सेक्स अँड चीटिंग’ या चित्रपटात काम केले आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत. आर्या तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. तिला कुत्र्यांची खूप आवड होती. तिच्याकडे एक कुत्रा देखील होता. सन 2020 मध्ये बॉलिवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाला सोडून गेले आहेत. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांतसिंग राजपूत, एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासह अनेक नावे आहेत.

संबंधित बातम्या : 

जगभरातील कलाकारांसाठी महत्त्वाची ‘Google Most Search List’ काय आहे?

रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली माहिती

(Actress who worked with Vidya Balan in the movie Dirty dies)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI