AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात मोठं पक्षी संग्रहालय गुजरातमध्ये; मुकेश अंबानींच्या मुलाचा पुढाकार!

'करलो दुनिया मुठ्ठी में' म्हणणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आता अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. (Reliance to build 'largest zoo in world' in Gujarat )

जगातील सर्वात मोठं पक्षी संग्रहालय गुजरातमध्ये; मुकेश अंबानींच्या मुलाचा पुढाकार!
| Updated on: Dec 20, 2020 | 9:59 AM
Share

अहमदाबाद: ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आता अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. रिलायन्स जगातील सर्वात मोठं पक्षी संग्रहालय उभारणार आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये हे पक्षी संग्रहालय साकारण्यात येणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या देखरेखीत हे पक्षी संग्रहालय साकारलं जाणार आहे. (Reliance to build ‘largest zoo in world’ in Gujarat )

280 एकर परिसरात जगातील हे सर्वात मोठं पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या पक्षी संग्रहालयात 100 वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी आणि साप ठेवण्यात येणार आहेत. येत्या दोन वर्षात जनतेसाठी हे पक्षी संग्रहालय खुले करण्यात येणार आहे. देशात कोरोनाचं संकट असल्याने या पक्षी संग्रहालयाच्या उभारणीस विलंब झाला असून आता मात्र हे पक्षी संग्रहालय झपाट्याने उभारण्यात येणार असल्याचं रिलायन्सच्या कार्यकारी समितीने स्पष्ट केलं आहे.

या पक्षी संग्रहालयाला ग्रीन्स जूलॉजिकल, रेस्क्यू अँड रिहॅब्लिटेशन किंगडम म्हटलं जाईल, असं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक परिमल नथवाणी यांनी सांगितलं. हे पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. या पक्षी संग्रहालयात प्राण्यांच्या प्रजातीनुसार सेक्शन तयार करण्यात येणार आहे. त्याला फॉरेस्ट ऑफ इंडिया, फ्रॉग हाऊस, इन्सेक्ट लाइफ, ड्रॅग्न्स लँड, एक्सोटिक आयलँड आदी नावे देण्यात येणार आहे. त्याची माहिती केंद्राच्या संकेतस्थळावरही देण्यात येणार आहे.

विविध प्रजातीचे पशू-पक्षी एकाच ठिकाणी

जगातील या सर्वात मोठ्या पक्षी संग्रहालयात एकाचवेळी विविध प्रजातीचे पशू-पक्षी पाहायला मिळणार आहे. त्यात बार्किंग हरिण, स्लेंडर लोरीस, स्लॉथ बियर, फिशिंग कॅट, कोमोडो ड्रॅगन आदींचा समावेश असेल. या संग्रहालयात भारतीय प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणावर भरणआ असेल. तसेच आफ्रिकन सिंहही पाहायला मिळणार आहे. 12 शहामृग, 20 जिराफ, 10 कायमॅन, 7 बिबटे, आफ्रिकन हत्ती आणि 9 ग्रेट इंडियन बस्टर्डही या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. तर बेडकांचा एक सेक्शन असणार असून त्यात 200 उभयचर प्राणी ठेवण्यात येणार आहे. तसेच 350 प्रकारचे मासेही या संग्रहालयात पाहायला मिळणार आहेत.

रिलान्सने जामनगरमध्ये एक केंद्रही स्थापन केलं आहे. या ठिकाणी एका बिबट्याला आणण्यात आलं होतं. जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्राण्यांना उपचारही मिळण्यास मदत होणार आहे. (Reliance to build ‘largest zoo in world’ in Gujarat )

संबंधित बातम्या:

उत्तर भारतात कडाक्याची थंडी का पडते?; भूगोल आणि बर्फवृष्टीचा काय आहे संबंध? जाणून घ्या

लय भारी! शेतकऱ्यांसाठी एमओएफएसने दिली ‘ही’ खूश खबर!

(Reliance to build ‘largest zoo in world’ in Gujarat )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.