
आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या चौदा वर्षीय कुस्तीपटूचा वजन करतानाचा विवस्त्र व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी कुस्ती प्रशिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागल आहे. तसेच या सगळ्या प्रकारामुळे चौदा वर्षांचा मुलगा प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा अकोला पोलिस हॉल येथे भरली होती. या स्पर्धेत विविध शालेयमधील कुस्तीपटू सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटू विद्यार्थ्यांचे वजन करणे या सर्वबाबी नियमानुसार पार पाडाव्या लागतात. यावेळी तेथे अनेक प्रशिक्षक देखील तेथे उपस्थित होते.
वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव
वजन करताना एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलाचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ शूट करण्यात आला. हा व्हिडीओ तेथे उपस्थित असलेल्या कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी रेकॉर्ड केल्याचा आरोप होत आहे. माधवे हे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील धमकी दिली. त्यानंतर काही काळातच मुलाचे विवस्त्र व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी खदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कुस्ती प्रशिक्षकाच्या या कृत्यामुळे 14 वर्षीय मुलगा प्रचंड मानसिक दबावाखाली आल्याचे वडिलांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यांनी हा संपूर्ण प्रकार कुस्ती संघटनेचे पदाधिकारी यांच्या कानावर घातल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कुणाल माधवे यांच्याविरुद्ध बीएनएस 296, 351 (2), माहिती तंत्रज्ञान अधिनिय 67 (B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढीत तपास देखील सुरु केला आहे.
या प्रकरणाची चौकशी केली असता कुणाल माधवे यांच्याविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. बदनामी होण्याच्या भीतीने तक्रार करीत नसल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी देखील कुणाल माधवे यांनी अनेक मुलांचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचे पालकांनी कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून कुणाल माधवे यांचा फोन तपासात आहे. त्यामध्ये इतर मुलांचे देखील फोटो आणि व्हिडीओ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.