विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली!

नाशिक : दोन मुलं चांगल्या पदावर असूनही आई रस्त्यावर भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर नाशिक पोलिसांनी माणुसकी दाखवत या मातेला तिच्या मुलांच्या हवाली केलंय. दोन्ही निर्दयी मुलांनी या मातेला घरातून बाहेर काढलं होतं. ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 61 वर्षीय प्रमिला नाना पवार यांना गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर रहावं लागलं. …

विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली!

नाशिक : दोन मुलं चांगल्या पदावर असूनही आई रस्त्यावर भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर नाशिक पोलिसांनी माणुसकी दाखवत या मातेला तिच्या मुलांच्या हवाली केलंय. दोन्ही निर्दयी मुलांनी या मातेला घरातून बाहेर काढलं होतं. ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 61 वर्षीय प्रमिला नाना पवार यांना गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर रहावं लागलं.

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांमुळे या मातेला तिच्या मुलांनी स्वीकारलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून प्रमिला पवार यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. एक मुलगा फौजदार आणि दुसरा कंडक्टर असून दोघांनाही चांगला पगार आहे, पण सांभाळत नाहीत, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्याप्रमाणे तपास करण्यात आला आणि या मातेला मुलांच्या स्वाधिन केलं.

1995 मध्ये प्रमिला पवार यांचे पती नाना पवार यांचं शिपाई पदावर असताना निधन झालं. यावेळी मुलं 14 आणि 15 वर्षांची होती. पतीच्या निधनानंतर प्रमिला यांनी मुलांना शिकवलं, मोठं केलं. मोठा मुलगा सतिश हा अनुकंपावर वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरीला लागला. तर दुसरा मुलगा आतिश हा कंडक्टर म्हणून कार्यरत आहे.

प्रमिला यांच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं असून ते नाशिकमध्ये राहतात. सुना सांभाळ करत नाहीत आणि मुलांनीही वेडं म्हणून घराबाहेर काढल्याचं प्रमिला यांनी व्हिडीओत म्हटलं होतं. प्रमिला यांचा मुलगा वस्तू आणि सेवा कर विभागात निरीक्षक पदावर आहे. नाशिक पोलिसांकडून दोन्ही मुलांचा शोध घेण्यात आला, त्यांचं समुपदेशन केलं आणि आईला अखेर तीन वर्षांच्या वनवासानंतर मुलांच्या स्वाधिन केलं.

दरम्यान, सतिश पवार हे पोलीस विभागात कार्यरत नाहीत, असं स्पष्टीकरणही नाशिक पोलिसांनी दिलंय.

VIDEO : प्रमिला पवार यांच्याशी बातचीत

संबंधित बातमी

व्हायरल व्हिडीओने पोलखोल, निर्दयी मुलांनी अखेर तीन वर्षांनी आईला स्वीकारलं 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *