AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध नृत्यांगनेने आयुष्य संपवलं, साई लॉजमध्ये आक्रित घडलं, महाराष्ट्र हादरला; कल्याणशी कनेक्शन काय?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध नृत्यांगनेने लॉजच्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

प्रसिद्ध नृत्यांगनेने आयुष्य संपवलं, साई लॉजमध्ये आक्रित घडलं, महाराष्ट्र हादरला; कल्याणशी कनेक्शन काय?
नृत्यांगनाImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 05, 2025 | 6:54 PM
Share

अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने आत्महत्या केली आहे. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. दिपालीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

रिक्षा चालकाने दिला लॉजचा पत्ता

दिपाली ही मुळची कल्याण येथील रहिवासी आहे. ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध करायला सुरूवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली आज आहे. रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मैत्रिणी सायंकाळी साई लॉजवर दिपालीला शोधण्यासाठी पोहोचल्या. तेव्हा तिची रूम आतून लॉक होती. लॉजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता समोर भयानक दृश्य होते. दिपालीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला होता. तिचा मृतदेह समोर टांगलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस सध्या तपास करत असून दिपालीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेत आहेत.

रोहित पवारांची पोस्ट

रोहित पवार यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत, “जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही” असे म्हटले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.