राहुल गांधी यांच्या एका फोनने महाराष्ट्रातील बंड शमले, काँग्रेसचा नेता माघारी फिरला…

चिखली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल फेसबुक लाईव्ह करत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांना थेट फोन करुन तुम्ही काँग्रेसचे लॉयल आहात, पक्षाला तुमची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर सूत्रे फिरली ...

राहुल गांधी यांच्या एका फोनने महाराष्ट्रातील बंड शमले, काँग्रेसचा नेता माघारी फिरला...
rahul gandhi and Rahul Bondre
| Edited By: | Updated on: Sep 21, 2026 | 11:00 PM

बुलढाणा येथील काँग्रेसला मोठा धक्का बसणार होता, माजी आमदाराने काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आणि हा माजी आमदार भाजपात सामील होणार होता. बुलढाणा येथील चिखली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत भाजपमध्ये जाण्याची घोषणाही केली होती. राहुल बोंद्रे यांच्या या निर्णयाने काँग्रेसचा मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले जात होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यात हा हादरा बसला जाणार होता. त्याच वेळी काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी थेट आपल्या आमदाराला फोन करुन त्यांना काँग्रेसमध्ये थांबवण्याची विनंती केली.

भाजपामध्ये प्रवेश करणार होते प्रवेश

चिखली विधानसभेचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा विचार कालच फेसबुक लाईव्ह करत बोलून दाखवला होता. ते भाजपात जात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या सहकाऱ्यांना आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले होते. याआधीही गेल्या दोन महिन्यात राहुल बोंद्रे यांनी दोनदा भाजपात आपण जात आहोत फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले होते.

माझे सर्वकाही गमावले तरी मी

चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी घेणार असल्याचे काल जाहीर केल्यानंतर आज लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना थेट फोन केला. तुम्ही पक्षासाठी चांगले कार्य केले आहे, तुम्ही लॉयल आहात.  तुमची पक्षाला गरज आहे. तुम्ही निर्णयाचा फेरविचार करा असे राहुल गांधी यांनी त्यांची मनधरणी करत सांगितले. त्यानंतर राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधी यांना तुम्ही मला फोन केलात, माझी दखल घेतली. आता माझे सर्वकाही गमावले तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us