परदेशी दाम्पत्याचं कौतुक का होतंय ? परदेशी दाम्पत्याचा पुढाकार पाहून अधिकारी सुद्धा भारावले…

डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांनी 'आशी' नावाच्या विशेष काळजी असलेल्या मुलीला दत्तक घेण्यापूर्वी त्यांना जुळी बालके आहे. त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे.

परदेशी दाम्पत्याचं कौतुक का होतंय ? परदेशी दाम्पत्याचा पुढाकार पाहून अधिकारी सुद्धा भारावले...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 15, 2023 | 10:03 AM

नाशिक : सध्या नाशिकमध्ये एका परदेशी दाम्पत्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असून जोरदार कौतुक केलं जात आहे. एका परदेशी दाम्पत्याने ( American couple )  नाशिकच्या आधारआश्रमातील ( Aadhaar Ashram ) एका चिमुकलीला दत्तक घेतलं आहे. त्यात तुम्हाला वाटेल की यामध्ये काय कौतुक करण्याचा विषय आहे. दत्तक ( adopted ) तर कुणीही घेऊ शकतं. अनेक जोडपी मुलं दत्तक घेतात. मात्र, हा विषय थोडा वेगळा आहे. आणि हेच कारण कौतुकाचा विषय ठरत आहे. आधार आश्रमातील विशेष काळजीची चिमुकली ‘आशी’ हिला अमेरिकन दाम्पत्याने दत्तक घेतले आहे.

‘आशी’ ला दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित अमेरिकन दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांनी ‘आशी’ नावाच्या विशेष काळजी असलेल्या मुलीला दत्तक घेण्यापूर्वी त्यांना जुळी बालके आहे. त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यानंतर तिसरे बालक त्यांनी दत्तक घेतले आहे.

कुमारी आशी हिला जन्मतः एकच किडनी आहे. तीची जीभही टाळूला चिटकलेली आहे. त्याची शस्रक्रिया करण्याची तयारीही जमशेदी यांनी दाखवली आहे. त्यामुळे या परदेशी दाम्पत्याचा हा पुढाकार चर्चेचा विषय ठरत आहे.

आधार आश्रमातील अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपन आणि पुर्नवसनाचे काम हे महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून केले जाते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन यांच्या सुचनेवरुन ही कार्यवाही करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील आधाराश्रमातील आशी नावाच्या बालिकेला परदेशी दाम्पत्याच्या स्वाधीन करत असतांना जिलधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थित ही प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल हे देखील उपस्थित आहे.

मागील 8 महिन्यांपासून ही प्रक्रिया सूरू होती, 14 फेब्रुवारी ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुर्ण करण्यात आली आहे. परदेशी दाम्पत्याला जुळी बालके असतांना देखील त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची ईच्छा व्यक्त केली होती.

आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया आहे. त्यात ही प्रक्रिया नाशिकमधून पूर्ण झाली असून देशांतर्गत अशा स्वरूपाचे चार आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून पारित केले आहे.

दत्तक प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, आधाराश्रमाचे व्यवस्थापक राहूल जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.