पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान

| Updated on: Jul 21, 2021 | 9:34 PM

पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला.

पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान
अभिजीत पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
Follow us on

पनवेल : ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’ या नामांकित पुरस्काराने भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी 20 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 वाजता हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा, पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आलं. (Abhijeet Patil honored with Made in India 2021 Award by Governor Bhagat Singh Koshyari)

गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी मारलेली उत्तुंग भरारी अशी अभिजीत पाटील यांची ओळख आहे. हे सगळं करत असताना दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळं होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला. आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन येथे मेड इन इंडिया आयकॉन 2021 हा नामांकित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

अभिजीत पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

‘मला मोठ्या यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश! पण पुरस्कार मिळाल्यापासून माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघत आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही. त्याच्याकडे नीट बघतो आहे . शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारतोय. बरेच पुरस्कार मिळाले मिळत आहेत पण यामुळे डोक्यात अजिबात हवा जाणार नाही याची शास्वती देतो. स्वतः ला अर्थवटच्या भूमिकेत पाहतो कारण परिपूर्ण होऊन संपण्याची माझी इच्छाशक्ती नाही. आणि इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे, अशी प्रतिक्रिया अभिजीत पाटील यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिलीय.

इतर बातम्या :

“राहुल गांधींच्या फोन हॅकिंगमध्ये अझरबैजान आणि रवांडा सरकारचा हात”, नितीन राऊतांकडून मोदी सरकारची खिल्ली

राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात, राज्यात सध्या असे दुर्दैवी चित्र : आशिष शेलार

Abhijeet Patil honored with Made in India 2021 Award by Governor Bhagat Singh Koshyari