
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयानंतर मराठी भाषेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे, पहिलीपासून हिंदी भाषा नको यासाठी जोरदार विरोध होत आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. याविरोधात मनसे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता सपा नेते अबू आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे,’ असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे, असं आझमी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संसदेत एक कमिटी आहे भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा सवालही यावेळी आझमी यांनी उपस्थित केला आहे.
मनसे, ठाकरे गट युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया
दरम्यान सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहातील, त्यात आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही, ते फक्त नफरतचं राजकारण करतात. दररोज उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोलणं हाच त्यांचा धंदा आहे, अस आझमी यांनी म्हटलं आहे.