AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅड. पानसरे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, न्यायाधीशांनी संशयितांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळाला

हत्या होण्याआधी काही दिवसापूर्वी झालेली आंदोलने अलीकडच्या काळात खूप गाजली होती. कोल्हापूरच्या टोल प्रश्नाबाबत त्यांची भूमिका आक्रमक होती. कोल्हापूरात ज्यावेळी शाहू ग्रंथ महोत्सव झाला तेव्हा गोविंदराव पानसरे यांनी नथुराम गोडसे आणि या प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला होता.

अ‍ॅड. पानसरे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, न्यायाधीशांनी संशयितांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळाला
पानसरे हत्या प्रकरणी सचिन अंदूरे, विरेंद्र पवार यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 25, 2022 | 5:20 PM
Share

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्तेबाबत सरकारी पक्षाकडे कोणताही सबळ पुरावा नसल्याने यामधील संशयित आरोपी विरेंद्र तावडे व सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे असा केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी शेळके (B.D. Shelake) यांनी फेटाळला आहे. त्यामुळे पानसरे हत्येबाबत ही मोठी घडामोड आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. त्यातील काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यात ऑगस्ट 2013 मध्ये हत्या झाली होती तर त्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरे यांचीही हत्या (Pansare Murder) करण्यात आली होती. त्यानंतर काही संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सबळ पुरावा नसल्याने विरेंद्र तावडे व सचिन अंदूरे यांना दोषमुक्त करावे असा संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. पण सरकार पक्षातर्फे खटल्यात सबळ पुरावा आणि खटला चालविण्यात पुरावे दाखल केले असल्याने संशयितांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायाधीश शेळके यांनी आज, सोमवारी फेटाळला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सामाजिक चळवळीतील अण्णा

कोल्हापूरातील कॉम्रेड गोविंद पानसरे हे नाव सामाजिक, राजकीय, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रीत आदराने घेतले जात होते. लोकशाहीवर प्रचंड निष्ठा ठेऊन त्यांनी कोल्हापूरसह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माणसांसाठी आवाज उठवला होता. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी विचारांची लढाई विचाराने लढत होते.

अनेक प्रश्नांवर आयुष्यभर लढा

जातीय सलोखा निर्माण करण्यापासून ते नेमका इतिहास मांडण्यापर्यंत आणि कोल्हापूरच्या टोल प्रश्नांपासून कामगारांच्या मागण्यांपर्यंत त्यांनी विविध प्रश्नांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला.

नथुराम गोडसेवर कडाडून हल्ला

त्यांचे हत्या होण्याआधी काही दिवसापूर्वी झालेली आंदोलने अलीकडच्या काळात खूप गाजली होती. कोल्हापूरच्या टोल प्रश्नाबाबत त्यांची भूमिका आक्रमक होती. कोल्हापूरात ज्यावेळी शाहू ग्रंथ महोत्सव झाला तेव्हा गोविंदराव पानसरे यांनी नथुराम गोडसे आणि या प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला होता.

पुण्याहूनही पानसरे यांना धमकीची पत्रे

तर निवृत्त पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकावर माजी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि गोविंदराव पानसरे यांची भाषणे झाली होती. या कार्यक्रमानंतर पुण्याहूनही पानसरे यांना धमकीची पत्रे आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यावर गोळीबार होऊन त्यांचा त्यातच मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

Fact Check: IAS सोनकरांनी खरंच हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडवर पाय ठेवत रुग्णांशी संवाद साधला? व्हायरल होत असलेल्या फोटोचं सत्य काय?

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’ पाहणाऱ्यांसाठी चिन्मय मांडलेकरची कळकळीची विनंती; ‘ती’ चूक करण्याआधी हा Video पहा!

Devendra Fadnavis Tweet: समझदार को इशारा काफी की कोतेपणा? फडणवीसांचं ते ट्विट चर्चेत, ठाकरे, देसाई म्हणजे ‘ऑदर लीडर्स’

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.