आज होणार सिया गोयल हिचा फैसला! 400 फूट खोल दरीत केतनला ढकलणाऱ्या दोन्ही आरोपींना..

Ketan Murder Case : केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यामध्येच काल पोलिस दोन्ही आरोपींना घेऊन लोहगडावर गेले होते. आज दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे.

आज होणार सिया गोयल हिचा फैसला! 400 फूट खोल दरीत केतनला ढकलणाऱ्या दोन्ही आरोपींना..
Ketan Murder Case
| Updated on: Jun 29, 2026 | 8:06 AM

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या करण्यात आली. सुरूवातीला ही हत्या नसून अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्यानंतर एका मागून एक धक्कादायक खुलासे झाले. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चाैधरी याच्यासोबत मिळून केतनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. 18 जूनपूर्वीही त्यांच्याकडून केतनला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी तो वाचला. शेवटी तगडी प्लॅनिंग सिया आणि चेतन यांनी एका कॅफेत बसून केली. इशारे ठरवले. जर यावेळीही केतन वाचला असता तर त्याला रोड अपघातात मारण्याचा सिया गोयल आणि चेतनचा प्लान होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिया आणि चेतनला केतनला संपवायचे होते. केतनच्या बहिणीला सर्वात अगोदर सियावर संशय आला. त्यानंतर पोलिस तपासात जे काही पुढे आले, त्याने देश हादरला.

केतन अग्रवाल याचे कुटुंबिय लेकाच्या न्यायासाठी लढत आहेत. केतन उच्चशिक्षित होता, विदेशात आपले शिक्षण पूर्ण करून आला होता. तो त्याच्या वडिलांच्या बांधकाम व्यावसायात उतरला होता. त्याने स्वतंत्र साईटही सुरू केली होती. केतनच्या कुटुंबियांनी सिया गोयल हिच्यासोबत त्याचे लग्न ठरवले. मात्र, सिया हिच्या मनात केतनविषयी काही वेगळेच सुरू होते. सिया गोयल आणि चेतन अग्रवाल यांना पोलिसांनी अटकही केली.

केतन अग्रवाल हत्याकांडामधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार आहे. केतन हत्याकांडामधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज संपणार आहे. दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांना पोलिस हजर करतील.

काल भल्ल्या पहाटे लोणावळा पोलिस दोन्ही आरोपींना घेऊन लोहगडावर पोहोचले होते. त्यांनी तिथे क्राईम सीन रिक्रिएशन केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्हीची चाैकशी केल्याचीही माहिती मिळत आहे. ह्या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 लोकांचे जवाब लोणावळा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. पोलिस दोन्ही आरोपींची कोठडी मागण्याची शक्यता आहे. कारण अजून तपास राहिला आहे. या प्रकरणाचा लोकांमध्येही मोठा संताप बघायला मिळतोय.

Follow Us