AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे, लोहगड बंद..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. यादरम्यानच पोलिसांनी आज सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांना लोहगडावर नेले आहे. तिथे नक्की काय घडले, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून तपासला जाणार आहे.

सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे, लोहगड बंद..
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 28, 2026 | 10:37 AM
Share

केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकराच्या मदतीने केतनची हत्या केली. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दर्शवण्यात आले. जसा जसा पोलिस तपास पुढे गेला, तशी धक्कादायक गुपिते उघड होत आहेत. केतन सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला, असे सियाने सांगितले होते. मात्र, सियाने आपला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने 400 फूट खोल दरीत केतनला धक्का दिला. त्यानंतर 15 मिनिटे ती एकाच जागी बसून राहिली. त्यानंतर तिने चेतन सुरक्षित निघाल्याचे कळताच खोटा नाटक सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून सियाकडून केतनला मारण्यासाठी प्रयत्न केला जात होता. यापूर्वीही तिने लोहगडावरच केतनला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनने झाडाला धरल्यामुळे तो वाचला. त्यावेळी तिने साप दिसल्याचा बहाना केला. सियाची कसून चाैकशी केली जात आहे.

पोलिसांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार देखील मिळाला. आता मोठी माहिती पुढे येत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर घटना रिक्रिएशन करण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याला लोणावळा पोलीस लोहगडावर घेऊन गेले आहेत. लोहगडावर केतनच्या हत्येची घटना कशी घडली नक्की कोणी काय केला होत, या सगळ्या संदर्भात या आरोपींकडून माहिती घेतली जात आहे.

नेमकी त्या दिवशी त्या क्षणी घटना कशी घडली हे रिक्रेट करण्याकरता पोलीस दोन्ही आरोपींसह लोहगडावर गेलेले आहेत. सकाळी 6 च्या सुमारास लोहगडावर पोलीस ह्या दोन्ही आरोपींना घेऊन गेलेले आहेत. ह्या प्रोसेसमध्ये हत्येचा सीन क्रिएट केला जातो, नेमके कोणी काय केले केतन किती वाजता तिथे पोहोचला, चेतन केव्हा तिथे होता या सगळ्याविषयीची माहिती सीन रिक्रिएशनद्वारे घेतली जाते.

आज लोहगड सर्वसामान्यासाठी पोलिसानी बंद केला आहे. कुठल्याही व्यक्तीस गडावर जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलिस सर्व घटनाक्रम पुन्हा पाहणार आहेत. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. सर्व प्लॅनिंग नियोजित होते. मात्र, पोलिसांनी तपासात सर्वकाही पुढे आणले. सियाच्या आई वडिलांचीही चाैकशी केली जात आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू