AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाच्या आई वडिलांनी पोलीस चौकशीत सगळे सांगितले, थेट चेतन आणि सियाच्या नात्यावरही..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांकडून सिया गोयल हिच्या आई वडिलांची तब्बल 12 तास चाैकशी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांच्या प्रश्नांना सियाच्या आई वडिलांनी असे काही उत्तरे दिली, ज्याने काही गोष्टी स्पष्ट झाल्या.

सियाच्या आई वडिलांनी पोलीस चौकशीत सगळे सांगितले, थेट चेतन आणि सियाच्या नात्यावरही..
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 28, 2026 | 8:58 AM
Share

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. होणारी पत्नी सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने गडावरून ढकलून दिले. केतनची हत्या करण्यापूर्वी त्यांनी गडाची रेकी केली होती. सुरूवातीला हा फक्त अपघात दाखवण्यात आला. मात्र, तपासात ज्याकाही गोष्टी पुढे आल्या, त्याने मोठी खळबळ उडाली. 18 जूनपुर्वीही सिया गोयल हिने अनेकदा केतन अग्रवाल याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी तिचा प्लान फसला. शेवटी प्रियकर चेतन चाैधरी याने तुझ्या एकटीकडून काहीच होणार नाही. म्हणत तो देखील त्यादिवशी लोहगडावर पोहोचला होता. केतन अग्रवाल याची हत्या करण्यापूर्वी सर्वकाही नियोजित होते. आदल्यादिवशी एका कॅफेत बसून सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांनी प्लॅनिंग केले होते. एकमेकांना कधी काय इशारे द्यायचे हे देखील त्यांनी अगोदरच ठरवले होते.

यापूर्वीही ती केतनला घेऊन गडावर गेली होती. तिने केतनला धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर केनतने एका झाडाला पकडले. त्यावेळी तिने साप बघितल्याचा बहाना केला. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर देशात खळबळ उडाली. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर क्रिकेटर चेतन चाैधरी यांना अटक केले. त्यांची कसून चाैकशी सुरू आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात लोणावळा पोलिसांकडून नुकताच सिया गोयल हिच्या आई वडिलांची चाैकशी करण्यात आली. तब्बल 12 तास ही चाैकशी सुरू होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतरही सिया नेहमी चेतन याच्यासोबत भेटत होती, याची तुम्हाला माहिती होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले.

सिया गोयल हिच्या आई वडिलांनी म्हटले की, याबाबत आम्हाला काहीचं कल्पना नव्हती. सिया गोयल हिच्या आई वडिलांना पोलिसांकडून अनेक प्रश्न करण्यात आली. सिया गोयल हिच्या आई वडिलांकडून अगोदरच सांगण्यात आले की, आम्हाला सिया आणि चेतन याच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच कल्पना नव्हती. आम्ही कधी साधे त्या मुलाला भेटलो देखील नाहीत.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी