गुप्तरोगांवर जालीम इलाजाचा दावा, मुंबईतून 10 भोंदू डॉक्टरांवर मोठी कारवाई
मुंबईत गुप्तरोगांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या 10 बोगस डॉक्टरना क्राइम ब्रँचने जेरबंद केले आहे. या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही पदवी नसल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईत गुप्तरोगावर उपचाराचा दावा करणाऱ्या 10 बोगस डॉक्टरांना मुंबई क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे. या डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही ते बिनधास्त डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. क्राइम ब्रँच युनिट 7 ने मुंबईतील विविध भागात छापा टाकून ही कारवाई केली आहे. मुंबईतील भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील गल्लीबोळात दुकान उघडून गुप्तरोगांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांच्या मुसक्या क्राईम ब्रँच युनिट सातने आवळल्या आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. मुंबईतील भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत एकत्र येत ही संयुक्त कारवाई केली आहे. सर्वसामान्य आजारांसह गुप्तरोगांवरही बोगस डॉक्टरांकडून उपचाराचा दावा केला जात होता. हे भोंदू डॉक्टर विविध उपचार प्रणालींचा बिनधास्त वापर करत होते. अॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने ते रुग्णांवर उपचार करत होते. हे डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून मोठी फी घेत होते. काही क्लिनिकमध्ये मुदतबाह्य आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा साठा सापडला आहे.या औषधांची विक्रीही केली जात असल्याचे कारवाईत उघड झाले आहे. या छापेमारीत औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक गोळ्या आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, 1961 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कचा आणखी विस्तार आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटक केलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरु आहे. त्यांनी किती जणांची फसवणूक केली याचीही माहिती घेतली जात आहे.
पकडलेले 10 बोगस डॉक्टर
- शेख मोहम्मद अन्वर मोहम्मद अस्लम आणि मो. नबी हुसेन मो. फरीद शेख : संतोष हेल्थ क्लिनिक, भांडूप
- इम्रान अब्दुल जब्बार खान : विनायक हेल्थ क्लिनिक, भांडूप
- दयाशंकर हुबलाल सिंग आणि जुनेद रहमतुल्लाह सिद्दीकी : हमदम दवाखाना, जोगेश्वरी
- शहाबुद्दीन निजामुद्दीन शेख : कोहिनूर दवाखाना, जोगेश्वरी
- डॉ. जावेद जाहेद खान आणि डॉ. रशिद हुसेन बेग : अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, बोरीवली
- रशिद हुसेन अफजल हुसेन शेख : दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक, दहिसर
- निहाल अराफत हुसेन शेख : समर आयुर्वेदिक दवाखाना, मानखुर्द