‘बुलेटची’ हौस दुचाकीस्वारांना पडली महागात; सायलेंसर आणि नंबरप्लेटही केल्या जप्त…

बुलेटला मॉडीफाय करण्याच्या नादात वाहनामध्ये छेडछाड करून वेगवेगळे बदल करत असतात. अनेकजण सायलेंसर बदलून मोठा आवाज येणारा तसेच फटाक्यांसारखा आवाज येणारा सायलेंसर बसवून गर्दीच्या ठिकाणी बुलेट फिरवण्याचे फॅड वाढले आहे.

बुलेटची हौस दुचाकीस्वारांना पडली महागात; सायलेंसर आणि नंबरप्लेटही केल्या जप्त...
| Edited By: | Updated on: Feb 20, 2023 | 6:34 PM

चंद्रपूर: बुलेटला कर्णकर्कश हार्न बसवून मोठ्या प्रमाणात आवाज काढणाऱ्या बुलेटराजांवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आता कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाईदरम्यानच त्यांचे कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेंसर, मॉडीफाय केलेले नंबरप्लेटही काढण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत पाच बुलेटराजांवर कारवाई करत प्रत्येकी 12 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.
या कारवाईमुळे बुलेटराजांचे धाबे दणाणले असून चंद्रपूरातील बुलेटप्रेमींवर आता भीतीचे वातावरण पसरले आहे. तरुणांमध्ये कर्कश्श दुचाकी वाहनांचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अनेक तरुण बुलेटला मॉडीफाय करण्याच्या नादात वाहनामध्ये छेडछाड करून वेगवेगळे बदल करत असतात. अनेकजण सायलेंसर बदलून मोठा आवाज येणारा तसेच फटाक्यांसारखा आवाज येणारा सायलेंसर बसवून गर्दीच्या ठिकाणी बुलेट फिरवण्याचे फॅड वाढले आहे. या दुचाकीस्वारांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही याचा त्रास होतो आहे.

या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

बाब गांभीर्याने घेत विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पथक तैनात करण्यात आली आहेत.

दुचाकीच्या या आवाजामुळे शाळा, महाविद्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार फिरत असतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरातील विद्यार्थी आणि रुग्णांना याचा त्रास होत असतो. या कारवाईमुळे आता जोरदार आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता चाप बसणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या कारवाईमुळे आता दुचाकीबरोबरच वाहनाबाबत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जोरदार आवाज करत बुलेट घेऊन फिरणाऱ्यांमुळे नागरिकांना आवाजाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे वेगवेगळ्या आवाज करत फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केल्यामुळे आता या अशा प्रकार थांबण्यास मदत होतील असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.