नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानांचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
अभिनेते नाना पाटेकर यांना पुन्हा शुन्यातून सुरुवात करायची होती. त्यांची तब्येत उत्तम होती. परंतू हार्ट अटॅक आल्याने दुर्दैवीपणे त्यांचे निधन झाल्याचे त्यांचा मुलगा मल्हार यांनी म्हटले आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या पुणे येथील गावी डोणजेत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला आहे. त्यांच्या चितेला त्यांचा पूत्र मल्हार यांनी अग्नि दिला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना वडिलांबद्दल माहिती दिली, नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले.त्यांचे नाम फाऊंडेशन आणि इतर संस्थाचे काम यापुढे सुरु राहिल असेही मल्हार यांनी म्हटले आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांना पुन्हा शुन्यातून सुरुवात करायची होती.त्यांची तब्येत उत्तम होती. परंतू हार्ट अॅटक आल्याने दुर्दैवीपणे त्यांचे निधन झाल्याचे त्यांचा मुलगा मल्हार यांनी अंत्यसंस्कारानंतर म्हटले आहे. त्यांनी सर्व संस्थांचे काम वाटून दिले होते. जबाबदारी वाटून दिली होती. नाम फाऊंडेशन, निर्मला गजानन फाऊंडेशन या संस्थांद्वारे ५३ व्हर्टिकलमध्ये काश्मीरपर्यंत आम्ही काम करतो. आता पॅन इंडिया काम करायचे होते. त्यांना शुन्यातून सुरुवात करायची होती. सगळे चांगले होते. उत्तम तब्येत होती.पण दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे काम आम्ही पुढे सुरु ठेवू असेही ते म्हणाले.
अभिनेता नाना पाटेकर यांचे गोव्यात त्यांच्या घरी एकांतात असताना निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील डोणजे येथील गावी आणण्यात आले, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे, चंद्रकांत पाटील, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना यांची पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार पाटेकर उपस्थित होते. मल्हार पाटेकर याने वडिलांच्या चितेला अग्नी दिला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलगा मल्हार याने आपल्या वडिलांची तब्येत उत्तम होती. पण दुर्दैवी प्रकार घडला. त्यांना पुन्हा शुन्यातून उभे राहायचे होते. त्यांच्या नाम फाऊंडेशन आणि निर्मला गजानन फाऊंडेशनचे काम देशभरात चालत होते. त्यांनी संस्थेची सर्व कामे वाटून दिली होती. आता त्यांचे हे मानवतेचे काम आपण पुढे सुरु ठेवूयात तुम्ही मला या कामांसाठी मदत करा असे आवाहनही मल्हार पाटेकर यांनी उपस्थितांना केले आहे.