AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar: 73 वर्षांपूर्वीचे लता मंगेशकरांचे गाणे, सरोज खानने रडत रडत केला डान्स! सेटवर काय घडलं होतं?

Lata Mangeshkar: १९५३ साली, म्हणजे जवळपास ७३ वर्षांपूर्वी आलेल्या गाण्याचा एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. तर सरोज खान यांनी त्यावर डान्स केला होता. पण असं काही घडलं की सरोज खान रडत रडत या गाण्यावर नाचत होत्या.

Lata Mangeshkar: 73 वर्षांपूर्वीचे लता मंगेशकरांचे गाणे, सरोज खानने रडत रडत केला डान्स! सेटवर काय घडलं होतं?
Saroj khan and lata mangeshkarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 11:39 AM
Share

बॉलिवूडमधील गाणी ही कायमच चर्चेत असतात. या गाण्यांच्या मागची कहाणी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांची तर कायमच चर्चा रंगते. नुकताच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचा एक किस्सा समोर आला आहे जो ऐकून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. 73 वर्षांपूर्वी सरोज खान यांनी डान्स केलेले गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. या गाण्याच्या वेळी त्या नाराज झाल्या होत्या.

सध्या सोशल मीडियावर सरोज खान यांचा एक जुना व्हिडीओ चाहत्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरोज खान यांनी त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमधील प्रवासाविषयी देखील सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला. जेव्हा एका गाण्यात त्यांना त्यांचा कॉस्ट्युम आवडला नव्हता, तेव्हा त्या रडतच डान्स करू लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, “मला काही माहिती नव्हतं, मी डान्स करत असे. एका चित्रपटात त्यांना राधा-कृष्ण हवे होते. मला आठवतं, मला राधा बनवण्यात आलं होतं. माझा कॉस्ट्युम चांगला नव्हता, म्हणून मी रडायला लागले. आणि नाज, बेबी नाज ज्या एक मोठ्या कलाकार होत्या आणि वयानेही माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, आम्ही दोघी एकाच शाळेत शिकत होतो – त्यांना कृष्ण बनवण्यात आलं होतं कारण त्यांना डान्स करता येत नव्हता. मला आठवतं की मी रडतच तो डान्स करत होते, कारण माझा कॉस्ट्युम चांगला नव्हता. पण आम्ही ते गाणं केलं.” हा चित्रपट १९५३ मध्ये आला होता आणि त्याचं नाव ‘आगोश’ होतं. या चित्रपटात नूतन, नासिर खान लीड रोलमध्ये होते. बेबी नाज आणि सरोज खान दोघींनीही या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

माधुरी आणि श्रीदेवी यांच्यासोबत दिलेले आठवणीत राहणारे गाणे

सरोज खान यांना भारतीय सिनेमातील सर्वात प्रभावशाली नृत्यदिग्दर्शकांपैकी एक मानलं जातं. त्यांचे करिअर ४ दशकांहून अधिक काळ टिकले आणि त्यांनी २,००० हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. त्यांनी भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य शैलींना सिनेमाई कथाकथनाच्या अंदाजात मिसळून बॉलिवूड डान्स पूर्णपणे बदलून टाकला. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत त्यांच्या आठवणीत राहणाऱ्या कामातून ‘हवा हवाई’, ‘एक दो तीन’, ‘धक धक करने लगा’, ‘चोली के पीछे’ आणि ‘डोला रे डोला’ सारखी उत्कृष्ट गाणी समोर आली. नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

Follow Us
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार