AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश, आता पुढे काय? उज्ज्वल निकम म्हणाले….

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केलीय. तसेच सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.

सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश, आता पुढे काय? उज्ज्वल निकम म्हणाले....
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 18, 2023 | 6:11 PM
Share

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाच्या 11 मे च्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई होणे अपेक्षित होतं. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असं आदेशात म्हटलं होतं. पण 11 मे नंतर काहीही झालं नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही, असं कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचा आदेश दिलाय. तसेच दोन आठवड्यात काय कारवाई केली, याचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात काय-काय घडामोडी घडू शकतात याविषयी महत्त्वाची माहिती दिली. “सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी एक आठवड्यात सुनावणी घ्यावी. या सुनावणीत काय कारवाई झाली, तसेच याआधी काय-काय कारवाई करण्यात आली याचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत”, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

‘विधानसभा अध्यक्षांकडून शपथपत्र दाखल केलं जाईल ते महत्त्वाचं’

“सुप्रीम कोर्टाने 11 मे ला जो आदेश दिला होता त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने काय कारवाई केली, तसेच कारवाईला उशिर का झालाय, याचे कारणं आणि स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टात देणं आवश्यक आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. या प्रकरणी दोन आठवड्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून जे शपथपत्र दाखल केलं जाईल ते महत्त्वाचं असेल आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, हे बघणं महत्त्वाचं ठरेल”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.

पुढची कारवाई कशी असेल? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. त्यावर “सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे दोन आठवड्यात काय कारवाई केली, तसेच आगामी काळात किती वेळात कशी कारवाई केली जाईल, याबाबत माहिती मागवली आहे”, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्ट रिजनेबल वेळ ठरवून देणार?

“सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत सकृत दर्शनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर नाराजी जाहीर व्यक्त केलीय. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी मे महिन्यात आदेश दिला होता. त्यावेळी रिजनेबल वेळेत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असं म्हटलं होतं. रिजनेबल म्हणजे वाजवी वेळ. ही वेळ एक महिने किंवा जास्तीत जास्त दोन महिने, तीन महिने अशी असू शकते”, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

“सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात सुनावणी घ्यायचे आदेश दिले. तसेच ही सुनावणी किती आठवड्यात पूर्ण होईल, याचा लेखाजोखा मांडायला सांगितले आहे. कदाचित सुप्रीम कोर्ट आगामी काळात इतक्या वेळेत निर्णय घ्यावा याची डेडलाईन देऊ शकतं. विधीमंडळ आणि सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांवर मोठी जबाबदारी आहे”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना