त्या एका पत्रामुळेच शिंदे गटाचा गेम होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा असीम सरोदांनी सांगितला अर्थ, 2 चुका बाहेर काढल्या!

शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत वाद होता तर राज्यपालांकडे पत्र का पाठवले? पक्षाचा मुद्ता होता तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवायला पाहिजे होते. शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीमधून 23 जून रोजी राज्यपालांना पत्र पाठवले, असे सरोदे यांनी यावेळी सांगितले.

त्या एका पत्रामुळेच शिंदे गटाचा गेम होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा असीम सरोदांनी सांगितला अर्थ, 2 चुका बाहेर काढल्या!
eknath shinde and kapil sibal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 7:01 PM

Shivsena Hearing Supreme Court – शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज (19 नोव्हेंबर) ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आपल्या या युक्तिवादात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. व्हीप म्हणून भरत गोगावले यांची केलेली निवड, बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पाठवलेले पत्र आणि त्याबाबतचा नियम असे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत सिब्बल यांनी शिवसेना पक्ष ठाकरे गटाचाच असल्याचा महत्त्वाचा युक्तिवाद यावेळी केला. दरम्यान, आता सिब्बल यांच्या युक्तिवादामागे नेमका तर्क काय आहे? नियम काय सांगतो? याची सविस्तर माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली. सरोदे यांनी केलेल्या मांडणीनुसार भविष्यात शिंदे गटाची चिंता वाढू शकते.

…ते कृत्य बेकायदा

असीम सरोदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना व्हीपनुसार भरत गोगावले यांची निवड योग्य आहे का? हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी आज मांडला. 20 जून 2022 रोजी क्रॅास व्होटिंग झाले. त्यावरही आजच्या सुनावणीत युक्तीवाद झाला. भाजप उमेदवाराला मतदान करणे हे अयोग्य आहे. कारण हे कृत्य बेकायदा आहे, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.

Loading...

आम्हीच शिवसेना पार्टी असल्याचे सांगितले जाऊ शकते का?

तसेच, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत वाद होता तर राज्यपालांकडे पत्र का पाठवले? पक्षाचा मुद्ता होता तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवायला पाहिजे होते. शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीमधून 23 जून रोजी राज्यपालांना पत्र पाठवले. या पत्रात आम्हीच शिवसेना पार्टी असल्याचे सांगितले जाऊ शकते का? असा मुद्दाही आज न्यायालयात उपस्थित करण्यात आला. सभागृहात राहून याबाबतची कार्यवाही करणे गरजेचं असतं. राजकीय पक्षाला उद्ध्वस्त करण्याचे काम करण्यात आले, असेही यावेळी सरोदे म्हणाले. दरम्यान, सरोदे यांनी दिलेल्या माहितीनंतर आता या प्रकरणात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात पुढील युक्तीवाद बुधवारी आणि गुरुवारी होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us