AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी कुठे गेली?

अमृता फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी ही आणखी काय खुलासा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं दिसून येतंय.

दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी कुठे गेली?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 29, 2023 | 8:55 AM
Share

निनाद करमरकर, उल्हासनगर, ठाणे : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महत्त्वाची आरोपी अनिक्षा (Aniksha) जयसिंघानी नेमकी कुठे गेली आहे, यावरून चर्चा सुरु झाली आहे. अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांना सोमवारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अनिक्षा हिला जामीन मंजूर करण्यात आला तर अनिल जयसिंघानी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर मंगळवारी अनिक्षा हिची भायखळा जेलमधून सुटका झाली. मात्र जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी उल्हासनगर येथील तिच्या घरी गेली नसल्याचं आढळून आलंय. उल्हासनगर येथील तिच्या घराला कुलूप

अनिक्षा जयसिंघानी अज्ञातस्थळी रवाना?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी केल्याचा आरोप आहे. १६ मार्च रोजी अनिक्षा जयसिंघानीला या प्रकरणात क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात अनिल जयसिंघानी प्रमुख आरोपी असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर करण्यात आला. त्यामुळे  दिसून येतंय. माध्यमांपासून लपण्यासाठी अनिक्षाने घरी येणं टाळलंय की काय असा संशय येतोय.

अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. मंगळवारी अनिक्षा जयसिंघानी हिची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली. त्यानंतर अनिक्षा डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून रवाना झाली. मात्र तिला ज्या घरातून अटक करण्यात आली होती, त्या उल्हासनगरच्या घरी ती आलेलीच नाही. या घराला कुलूप लागलेलं असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे. अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे.

कोर्टात पुन्हा कधी सुनावणी?

मध्य प्रदेशात अनिल जयसिंघानी याच्यावर दाखल करण्यात आलेल्या अन्य एका प्रकरणात पोलिसांनी मुंबई कोर्टातून अनिल जयसिंघानी याची ट्रांझिट रिमांग मागितली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होईल. तर अनिल जयसिंघानी याच्या जामीन अर्जावर ३१ मार्च रोजी सुनावणी करण्यात येईल. तर अनिल जयसिंघानी याच्यासोबत पकडलेला आणखी एक सहआरोपी निर्मल जयसिंघानी हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा