Santosh Pandit : संतोष पंडित यांचा झुकेंगा नहीं स्वॅग… थेट तुरुंगातून बाहेर येताच पहिला..

Santosh Pandit Pune News : संतोष पंडित पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी पुन्हा सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. जामीन मिळाल्यानंतर पहिला व्हिडीओ संतोष पंडित यांच्याकडून शेअर करण्यात आला.

Santosh Pandit : संतोष पंडित यांचा झुकेंगा नहीं स्वॅग... थेट तुरुंगातून बाहेर येताच पहिला..
Santosh Pandit
| Updated on: Sep 22, 2026 | 7:30 PM

व्यवस्थेनं गुन्हे दाखल करुन रातोरात अटक केली., तरी गलथानपणांवर बोट ठेवतच राहणार., हा दावा संतोष पंडितांना खरा करुन दाखवलाय… तुरुंगातून सुटल्यानंतर पंडित यांनी पहिला व्हिडीओ करत महापालिकेच्या कारभारावर टीका केलीय. अशाच दुरावस्थेवर बोलताना याआधीच्या एका व्हिडीओत अपशब्द वापरल्याचा आरोपात संतोष पंडितांना अटक झाली होती…मात्र अशा खड्ड्यांमुळे जे अपघात होतात., त्याप्रकरणी किती लोकांना अटक झाल्या., याचं उत्तर महापालिका आणि पुणे पोलिसांकडेही नाहीये, असे म्हणत त्यांनी आरोप केली. संतोष पंडितांनी आत्ताच्या व्हिडीओत भाषा अतिशय सभ्य वापरलीय.

त्यामुळे पुण्याच्या महापौर किती वेगानं हा खड्डा दुरुस्तीचे आदेश देतात..आणि तरीही हा रस्ता दुरुस्त न होवून अपघात घडल्या.,पुण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कुणावर कारवाई करतात., ते पाहणं महत्वाचं आहे. पुण्यातील युट्यूबर आणि सामाजिक समस्यांवर संतोष पंडित आवाज उठवतात. मात्र, 3 सप्टेंबर रोजी त्यांनी रात्री उशिरा पोलिसांकडून अटक करण्यात आली. जामीन मिळाल्यानंतर संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याने संतोष पंडित यांची थेट जेलकडे रवानगी झाली. अखेर त्यानंतर त्यांना जामिन झाला. जामिन झाल्यानंतर संतोष पंडित शांत होतील, असा अंदाज सर्वांचा होता. मात्र, मैं झुकेंगा नहीं साला… अशी भूमिका संतोष पंडित दिसत आहेत. त्यामध्येच संतोष पंडित यांना जामीन झाल्यानंतर माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी त्यांचा सत्कार केला. रविंद्र धगेंकर पंडितांचा सत्कार करण्यासाठी पोहोचले होते.

संतोष पंडित पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. संतोष पंडित यांनी पोलिसांकडून रात्री उशिरा अटक करण्यात आली. यावेळी स्वत:लाच मारून घेताना संतोष पंडित हे दिसले होते. त्यानंतर ते या विषयांवर बोलणार नसल्याचा अंदाज सर्वांचा होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. पुन्हा सामाजिक समस्या मांडताना संतोष पंडित हे दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us