AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फडणवीसांनंतर आता आणखी एका भाजपच्या बड्या नेत्याची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर आता भाजपच्या आणखी एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! फडणवीसांनंतर आता आणखी एका भाजपच्या बड्या नेत्याची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर
| Updated on: Jul 21, 2025 | 7:27 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांच्या निरोप संमारंभाप्रसंगी ते बोलत होते. तिकडे स्कोप नाहीये पण इकडे स्कोप आहे, उद्धव ठाकरे इकडे येऊ शकतात असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं होतं.

दरम्यान त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक बैठक देखील झाली, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक सभापती राम शिंदे यांच्या दालनात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधी पक्ष नेता, हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा अशा काही विषयांवर चर्चा झाली. मात्र ही बैठक देखील चर्चेचा विषय बनली. दरम्यान त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे देखील एकाच हॉटेलमध्ये दिसून आले, मात्र हा योगायोग असल्याचं दोन्हीही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरनंतर आता भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आले तर चांगलं होईल,  राजकारणात एका रात्रीत मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो. हे मी अनेक वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे, असं अशोक चव्हा यांनी म्हटलं आहे, अशोच चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवी आणि आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये दिसून आले होते, यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि फडणवीस एका हॉटेलमध्ये आले हा योगायोग होता, ते भेटले नाहीत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट