लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर आता राज्यात फ्रूट जिहाद; पडळकरांच्या आरोपांनी खळबळ

आज मुंबईमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर आता राज्यात फ्रूट जिहाद; पडळकरांच्या आरोपांनी खळबळ
gopichand padalkar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 8:16 PM

आज मुंबईमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांनंतर चर्चेला उधाण आलं आहे.  राज्यात लव्ह जिहाद व लँड जिहादनंतर आता फ्रूट जिहाद सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  राजगुरूनगर व मावळ येथे फ्रूट जिहाद झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. एफडीएने केलेल्या कारवाईचा दाखला देत केमिकल युक्त आंब्याचं ज्युस विकलं जात असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.  पुण्यात 3 हजार बनावट आंब्याचा पलप नष्ट करण्यात आला आहे.  मोहम्मद ऊर्फ आक्रम याच्या कारखान्यावर कारवाई झाली आहे. हा फ्रुट जिहादचा प्रकार आहे. बनावट रसायन मिसळून आंब्यात रस बनवला जात आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पडळकर? 

पुण्यात 3 हजार बनावट आंब्याचा पलप नष्ट करण्यात आला आहे.  मोहम्मद ऊर्फ आक्रम यांच्या कारखान्यावर कारवाई झाली आहे. हा फ्रुट जिहादचा प्रकार आहे. बनावट रसायन मिसळून आंब्यात रस बनवला जात आहे. एवढा स्वस्तात तुम्हाला हा रस कसा मिळतो? हा फ्रुट जिहादचा प्रकार आहे, लक्षात ठेवा.  तिघांच्या कारखान्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पोलिसांच्या माध्यमातून कारवाई व्हायला पाहिजे. कुठेही स्वस्तात अंब्याचा रस मिळत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे.  3 हजार किलो ज्यूस नष्ट करण्यात आलं आहे.  15 कोटी रूपयांचा रस विकला जात आहे,  यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. तातडीने ही कारवाई व्हायला पाहिजे, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं  पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, मुंबईतीस ज्युस सेंटरची देखील चौकशी करण्याची गरज आहे. केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा वापर थांबला पाहिजे
लोक पैसे मोजून भेसळयुक्त ज्युस किंवा दूध घेतात, पण यात त्यांची काय चूक आहे?  मी या संदर्भात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Follow Us