मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात, लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु

| Updated on: Feb 17, 2021 | 11:21 AM

Maharashtra Lockdown again : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीदेखील तसा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात, लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु
vijay wadettiwar
Follow us on

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या (Maharashtra Lockdown again)  उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीदेखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली. (Maharashtra corona cases)

मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत दबाव होता हे मान्य करत, आता तिथली रुग्ण संख्या वाढली याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम आणि कोरोना नियमावली पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. लग्न आणि इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल याचा पुनरूच्चार वडेट्टीवार यांनी केला.

लॉकडाऊनचे संकेत का?

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी 3800 कोरोना केसेस समोर आल्या. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोना केसेस वाढल्याचं समोर येतंय. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.

अजित पवारांच्या बोलण्यातून लॉकडाऊन लागण्याचे संकेत?

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचं आकड्यांवरुन लक्षात येतंय. लोकं कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. लोकं मास्क वापरत नाहीत. जरं हे सगळं असंच सुरु राहिलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कठोर निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले.

आरोग्य मंत्री काय म्हणाले? 

राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.  (Health Minister Rajesh Tope on lockdown in Maharashtra)

कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी आम्ही दोन गोष्टी ठरवल्या आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक कारवाईचे पालन करत नसतील तर कारवाई करण्याची मोकळीक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, हयगय नको

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. हयगय नको, आवश्यक तिथे कंटेन्मेंट झोन तयार करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

VIDEO :

संबंधित बातम्या  

मोठी बातमी : आवश्यक तिथं कंटेन्मेंट झोन तयार करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना आदेश

…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना