
“संतोष भय्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. जबाबदारी आपली आहे. टोकाच बोलतोय मी. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे, संतोष भय्याच्या मृत्यूचा बदला घेणं. त्यांना सुटून येऊ द्या जसं यायच तसं. भयंकर कृत्य आहे. इतका राग येण्यासाठी सारखी चूक नाही. तुम्हाला एवढी चीड यावी एवढं काही झालं नव्हतं. वाद, भांडण तंटा हे चालू असतं पण तिरस्कार, क्रूर हत्या करण्याएवढं काही झालेलं नाही. यांना पैसा, पद एवढच लागतं, कोणत्याही टोकाला जातील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर, निदर्यतेने हत्या करण्यात आली. ते फोटो आता व्हायरल झालेत. हे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे आज धनंजय देशमुख यांना भेटायला आले. त्यावेळी देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला.
धनंजय देशमुख घरात जायची हिम्मत नाही म्हणतायत, त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, “त्यांना जावं लागेल. मी सुद्धा कठोर काळजाचा आहे. एवढी घटना, फोटो बघितल्यावर कोणी पण खचून जाईल. त्यांना घरात जावं लागेल. बाहेर यावं लागेल. लढावं लागेल, बीमोड करायचा आहे” “सुटून बाहेर येऊ द्या. आता राहिले तर गोळ्या घालून फाशी होईपर्यंत लढावं लागेल. सुटून आले तर जशास तसं. आत राहिले तर फाशी होईपर्यंत लढावं लागेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका
फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं. “नुसत्या राजीनाम्याने होणार नाही. धनंज मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका. नाटकबाजी करायला नको. जनता काही करु शकते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमच्या एका डोळ्यात पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात आग दिसते. त्यावर “आपण पहिल्यापासून असाच आहे. अन्यायाचा बीमाोड करतो. पठ्ठाया कोणाला सोडीत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.