ऊस दरवाढ आंदोलन पुन्हा पेटलं, स्वभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, साखर कारखाना पाडला बंद

सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा ऊस दरवाढीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, बार्शीतील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे.

ऊस दरवाढ आंदोलन पुन्हा पेटलं, स्वभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, साखर कारखाना पाडला बंद
उसदर आंदोलन पुन्हा पेटलं
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 3:03 PM

ऊस तोडणीला सुरुवात झाली असून, सोबतच पुन्हा एकदा ऊस दरवाढीचा प्रश्न देखील समोर आला आहे. ऊस दरवाढीवरून अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुन्हा एकदा ऊस दरवाढीचं आंदोलन चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उसाच्या गव्हाणीमध्ये उड्या मारत हा साखर कारखाना बंद पाडला आहे. सोलापुरातील ऊस दरावर अद्याप तोडगा निघालेला नाही मात्र तरीही ऊस कारखानदारांनी कारखाने चालू ठेवले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून साखर कारखाना बंद पाडण्यात आला आहे.

पुन्हा एकदा ऊस दरवाढीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोलापुरातील ऊस दरावर अद्याप तोडगा निघालेला नाही मात्र तरीही ऊस कारखानदारांनी कारखाने सुरूच ठेवले आहेत. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील वृंदावन साखर कारखाना तर शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद केला आहे.  पदाधिकाऱ्यांनी उसाच्या गव्हाणीमध्ये उड्या मारत हा कारखाना बंद पाडला.

Loading...

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये जोपर्यंत ऊस दरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कारखाने बंद ठेवायचे आहेत, असं ठरलं आहे.  मात्र तरी देखील साखर कारखाने सुरूच आहेत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आता हा साखर कारखाना बंद केला आहे.  यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान शेतकऱ्यांनी फक्त साखर कारखानाच बंद पाडला नाही तर तेथील ट्रॅक्टरच्या चाकांमधील हवा देखील सोडून देण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस दरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील कारखाने चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. उसदरवावर तोडगा निघत नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us