AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Mahavitran Scam: राष्ट्रवादीच्या आमदाराने उघड केला 13 कोटींचा महास्कॅम! 6 बडे अधिकारी निलंबित, राज्यात खळबळ

बीड जिल्ह्यातील महावितरणाच्या कामांच्या कंत्राटामध्ये तब्बल 13 कोटींचा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. या 13 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी महावितरणच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Beed Mahavitran Scam: राष्ट्रवादीच्या आमदाराने उघड केला 13 कोटींचा महास्कॅम! 6 बडे अधिकारी निलंबित, राज्यात खळबळ
| Updated on: Nov 20, 2026 | 2:57 PM
Share

Beed Mahavitran Scam News:  बीडमधून एक सर्वात मोठी अन् धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील महावितरणाच्या कामांच्या कंत्राटामध्ये तब्बल 13 कोटींचा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. या 13 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी महावितरणच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी तक्रार दिली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बीड महावितरणमध्ये 13 कोटींचा घोटाळा… 

बीडच्या गेवराई मतदार संघामध्ये विद्युत विषयक विविध दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या 13 कोटी रुपयांच्या निधीमध्ये गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तक्रार केली होती. आमदार विजयसिंह पंडीत यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.

आमदार पंडीत यांनी केला पर्दाफाश, 6 जणांचे निलंबन!

त्यानंतर बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, अभियंता कुंभार, गोरे प्रधान व गुंजाळ यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आता संबंधित एजन्सीवर कारवाई करावी तसेच या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे.

आमदार विजयसिंह पंडीत यांचा प्रशासनावर हल्लाबोल! 

दरम्यान. या निलंबनाच्या कारवाईनंतर मूळ तक्रारदार तथा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ही निलंबनाची कारवाई फक्त केवळ वरवरची असून एकाच तालुक्यापुरती मर्यादित आहे. असाच गैरप्रकार शिरुर कासार, पाटोदा तसेच जिल्हांमधील असाच गैरप्रकार झाला आहे. यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आमदार विजयसिंह पंडीत म्हणाले. तसेच या संपूर्ण महाघोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आणि दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही,असा इशाराही आमदार पंडीत यांनी दिला आहे.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर