AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FEATURED

Road Accident: दर तीन मिनिटाला एक मृत्यू, वर्षाला जवळपास दोन लाख जणांचा बळी, मंत्रालयाची हादरवणारी आकडेवारी

Road Accident: वेग आणि बेशिस्तीमुळे देशात रस्ते अपघातातील बळींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सरकारने अनेक उपाय योजना करूनही दर ३ मिनिटाला एक मृत्यू तर वर्षात १.७२ लाखांचा जीव गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Road Accident: दर तीन मिनिटाला एक मृत्यू, वर्षाला जवळपास दोन लाख जणांचा बळी, मंत्रालयाची हादरवणारी आकडेवारी
दर तीन मिनिटाला एक मृत्यू, मंत्रालयाची हादरवणारी आकडेवारी
| Updated on: Nov 20, 2026 | 2:46 PM
Share

Road Accident: रस्ते अपघातात बळींची आकडेवारी भयावह आहे. वेग आणि बेशिस्तीमुळे रस्त्यावर मृत्यूला आमंत्रण मिळत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०२३ मधील संख्येनुसार, दर ३ मिनिटाला एक मृत्यू तर सरासरी प्रत्येक तासाला वीस आणि वर्षात १.७२ लाखांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या आकडेवारीने चिंता वाढली आहे. यामुळे प्रवासादरम्यान केवळ तुमचीच नाही तर रस्त्यावरील इतर वाहनधारकांच्या जीवाचाही विचार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हादरवणारी आकडेवारी

सरकारी आकडेवारीनुसार, या रस्ते अपघातात ४४.८ टक्के दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला. तर बेशिस्त वाहनधारकांमुळे २० टक्के पादचाऱ्यांचा जीव गेला. रस्त्याने जाताना वाहनांच्या धक्क्यांना त्यांचा जीव गेला. तर कारला सेफ्टी फिचर्स नसल्याने तीनपैकी दोघांना प्राणाला मुकावे लागले. मृतांची आकडेवारी पाहिली तर ८५ टक्के पुरुष अपघातात गेले. अनेक कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्याने मागे कुटुंबावर आर्थिक आणि भावनिक संकटाचा डोंगर कोसळला. तर कुटुंबातील लहान आणि किशोरवयीन मुलांचा आकडाही चिंताजनक आहे. रस्ते अपघातात ९,४८९ मुलांना जीव गमवावा लागला.

वेगाने होत्याचे नव्हते

रस्ते अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अनियंत्रित वेग, बेशिस्तपणा आणि व्यसन असल्याचे समोर आले आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातील टक्काही मोठा आहे. ग्रामीण भागात ६८ टक्के मृत्यू झाला आहे. दिल्लीत रस्ते अपघातात १,४५७ असे सर्वाधिक बळी गेले. तर राज्याचा विचार करता उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोक रस्ते अपघातात मरण पावले. देशातील एकूण मृत्यूच्या प्रमाणात १३.७ टक्के लोकांचा जीव गेला. देशातील सर्वात मोठ्या राज्यात २३,६५२ लोकांचा नाहक बळी गेला. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. ग्रामीण भागात शाळेत पायी जाणारी मुलांना, रात्री दुचाकीवर प्रवास करणारे, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याचा नादात सर्वाधिक अपघात झाले आहेत. अहवालानुसार, अनियंत्रित वेगाने अनेकांचा बळी गेला. हे प्रमाण ६८.१ टक्के इतके आहे.

अतिवेग, सिग्नल नसलेले चौक, सततच्या प्रवासाने डुलका लागलेला चालक, व्यसन केलेला चालक, बेशिस्त, वाहतुकीचे नियम न पाळणारे नागरिक, बेदकार वाहन चालवणारे आणि खटारा वाहनं रस्त्यावर आल्याने रस्ते अपघात वाढल्याचे समोर आले आहे. सध्याच्या अनेक अपघाताचे विश्लेषण केले असता, कमी वयातील मुलांच्या हाती स्टेअरिंग दिल्याने अपघात झाल्याचे दिसून येते. यामुळे रस्ते वाहतूक, वाहन चालवण्यासंबंधी जबाबदारी आणि जागरूकता आणणे गरजेचे असल्याचे समोर येते.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर