AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताची कमतरता होईल दूर? हाडांच्या मजबुतीसाठी मटणाचा ‘हा’ भाग ठरतो फायदेशीर! जाणून घ्या हैदराबादी मटण करी रेसिपी

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे आहारात पोषक घटकांचा समावेश करण्याकडे अनेकांचा कल असतो. मांसाहार करणाऱ्यांसाठी मटणापासून बनवले जाणारे विविध पदार्थ आवडीचे असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? रक्ताची कमतरता असाताना किंवा हाडांच्या मजबुतीसाठी मटणाचा कोणता भाग खाणं महत्त्वाचा ठरतो.

रक्ताची कमतरता होईल दूर? हाडांच्या मजबुतीसाठी मटणाचा 'हा' भाग ठरतो फायदेशीर! जाणून घ्या हैदराबादी मटण करी रेसिपी
mutton curryImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 2:39 PM
Share

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे आहारात पोषक घटकांचा समावेश करण्याकडे अनेकांचा कल असतो. मांसाहार करणाऱ्यांसाठी मटणापासून बनवले जाणारे विविध पदार्थ आवडीचे असतात. असाच एक खास पदार्थ म्हणजे मटन डब्बा करी. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये हा पदार्थ लोकप्रिय आहे. बकरी किंवा मेंढीच्या फुफ्फुसांपासून तयार होणारी ही करी मसालेदार आणि चविष्ट असते. काही ठिकाणी तिला पोटेल डब्बा करी किंवा डब्बा गोश्त असेही म्हटले जाते.

मटण डब्बा करीचे फायदे

मटण डब्ब्यामध्ये प्रथिने, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 यांसारखे पोषक घटक असतात. हे घटक शरीरातील विविध कार्यांसाठी महत्त्वाचे मानले जातात. प्रथिनांमुळे स्नायूंच्या आरोग्याला मदत होते, तर लोह रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. व्हिटॅमिन बी12 मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, या पदार्थाचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. तसेच, यामुळे श्वसनाचे आजार कमी होतात किंवा हिमोग्लोबिन निश्चित वाढते, असा दावा करण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

मटण डब्बा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ही करी बनवण्यासाठी बकरीचे स्वच्छ केलेले फुफ्फुस, 3 चमचे तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 कप पाणी घ्या. मसाल्यासाठी मूठभर कोथिंबीर, 2 मध्यम आकाराचे कांदे, 6-7 लाल मिरच्या, 2 चमचे काळीमिरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, मूठभर पुदिना आणि 2 टोमॅटो लागतील.

मटण डब्बा करी बनवण्याची पद्धत

1. सर्वप्रथम कोथिंबीर, कांदा, लाल मिरच्या, काळीमिरी, जिरे, आले-लसूण पेस्ट, पुदिना आणि टोमॅटो मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.

2. कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करून तयार केलेली मसाल्याची पेस्ट घाला. मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत ती व्यवस्थित परतून घ्या.

3. त्यानंतर स्वच्छ केलेले बकरीचे फुफ्फुस घालून त्यात मीठ आणि हळद मिसळा. हे मिश्रण साधारण 5 मिनिटे परतून घ्या.

4. आता कुकरमध्ये 2 कप पाणी घालून झाकण लावा. मध्यम आचेवर 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

5. कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडा. करी व्यवस्थित हलवून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

अशा प्रकारे घरच्या घरी चविष्ट मटन डब्बा करी तयार होईल. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत या खास पदार्थाचा आस्वाद घेता येईल. फुफ्फुसांचा पदार्थ असल्याने स्वच्छता, योग्य हाताळणी आणि पूर्ण शिजवण्याची काळजी नक्की घ्या.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर