AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai DCC Bank Election: मुंबई बँक निवडणुकीबाबत सर्वात मोठा निर्णय; भाजप-शिवसेनेचं ठरलं!

मुंबई जिल्हा बँक निवडणुकीबाबत सर्वात मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती म्हणून दोन्ही पक्ष सहकार पॅनलमध्ये लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Mumbai DCC Bank Election: मुंबई बँक निवडणुकीबाबत सर्वात मोठा निर्णय; भाजप-शिवसेनेचं ठरलं!
| Updated on: Nov 20, 2026 | 2:28 PM
Share

Mumbai DCC Bank Election 2026: मुंबई जिल्हा बँक निवडणुकीबाबत सर्वात मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती म्हणून दोन्ही पक्ष सहकार पॅनलमध्ये लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई जिल्हा बँक निवडणूक एकत्रित लढणार! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज शिवसेना नेते, उपसभापती सचिन अहिर यांच्या दालनामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. भाजप नेते प्रविण दरेकर, सचिन अहिर, मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे.

सहकार पॅनेलच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्रपणे निवडणूक लढणार आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा कायम असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. आजच्या बैठकीतील नेत्यांसोबत पक्ष श्रेष्ठींची पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे, त्यानंतर जागा वाटप निश्चित होईल, अशी माहिती समोर आली आहे.

शिंदेंनी केली होती स्वबळासाठी चाचपणी!

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याबाबत चाचपणी सुरु झाली होती. याबाबत पाडव्याच्या मुहूर्तावर एक महत्वाची बैठकही पार पडली होती. . बाळासाहेब भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये उपसभापती सचिन आहिर, उपमहापौर संजय घाडी, मंगेश सातमकर आदी नेत्यांसह मुंबईमधील विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुखही उपस्थित होते, त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना या निवडणुकीत भाजपला शह देण्याचा प्लॅन करणार का याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या.

दरम्यान, मुंबई जिल्हा बँक निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.  सध्या या बँकेच्या संचालक मंडळात 20 सदस्य आहेत. आमदार प्रसाद लाड, तेजस्विनी घोसाळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचाही संचालक मंडळात समावेश आहे.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर