AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana 3: आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ सिनेमाची मोठी अपडेट समोर, अजिंक्य देव यांचा खुलासा

Ramayana 3: अभिनेता रणबीर कपूर आणि अदिनाथ कोठारे यांनी मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. याबद्दल अभिनेते अजिंक्य देव यांनी खुलासा केला आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा सुरु आहे.

Ramayana 3: आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमाची मोठी अपडेट समोर, अजिंक्य देव यांचा खुलासा
Ramayana
| Updated on: Nov 20, 2026 | 2:29 PM
Share

Ramayana 3: अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मजल मारली, पण दुसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावलेला दिसला… सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे. सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1 हजार 547 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सिनेमा 2000 कोटी रुपयांचा आकडा पार करेल का? हिच चिंता आता निर्मात्यांना लागली आहे. सांगायचं झालं तर, फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिनेमाच्या सिक्वेलबद्दल सांगायचं तर, तो 2028 मध्ये प्रदर्शित होणार आहे, जरी सुरुवातीला तो 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित करण्याची योजना होती. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे, ‘रामायण’चा तिसरा भागही येईल का?

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमात महर्षी विश्वामित्र यांची भूमिका अजिंक्य देव यांनी साकारली होती. आता त्यांनी स्वतः या सिनेमाचं दोनपेक्षा जास्त भाग येऊ शकतात, याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मात्र, तिसऱ्या भागाबद्दल अद्याप काहीही ऐकलं नसल्याचं देखील अभिनेत्याने मान्य केलं आहे. परंतु, जर निर्मात्यांनी ही फ्रँचायझी पाच सिनेमांपर्यंत वाढवली, तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही ते म्हणाले.

अजिंक्य देव सीक्वेलबद्दल काय म्हणाले?

यादरम्यान अजिंक्य देव यांनी ‘रामायण’च्या दुसऱ्या भागाबद्दल माहिती दिली. अजिंक्य यांनी सांगितले की, “सिनेमाचा एक मोठा भाग आधीच शूट करण्यात आला आहे आणि सध्याही शूटिंग सुरू आहे. येणारा पुढचा भाग पहिल्या भागाच्या तुलनेत खूप मोठ्या स्तरावर असेल,” असेही संकेत त्यांनी दिले. “दुसऱ्या भागातील सर्वात मोठं  आकर्षण हनुमान असतील, ज्यांची भूमिका सनी देओल साकारत आहेत.”

एवढंच नाही तर, आणखी एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाचं आश्वासन देताना अजिंक्य देव पुढे म्हणाले, “मला वाटतं की पुढचा भाग जबरदस्त असणार आहे. तो खूप भव्य असेल. जर हा भाग मोठा असेल, तर पुढचा भाग त्याहूनही मोठा असेल.” असं देखील अजिंक्य देव म्हणाले.

नमित मल्होत्रा यांनी यापूर्वीच ‘रामायण’बद्दल स्पष्ट केलं आहे की, या सिनेमाचे केवळ दोनच भाग बनवले जातील. सध्या केवळ दोनच भागांबद्दलची माहिती समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या भागामध्ये कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे, हे देखील सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर