अहमदनगरच्या दोन मित्रांची कमाल; शेळ्यांच्या विक्रीतून कमावले 12 कोटी

शेळ्यांच्या विक्रीतून 12 कोटी, लेंडीखताच्या विक्रीतून 18 लाख, शेळीपालन कसं करावं हे शिकवण्याच्या मानधनापोटी 36 लाख रुपये इतके उत्पन्न या तरुणांना मिळते. | Goat income

अहमदनगरच्या दोन मित्रांची कमाल; शेळ्यांच्या विक्रीतून कमावले 12 कोटी
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:06 PM

अहमदनगर: गावाकडची पोरं शहरात येवून किती पगार मिळवतात, 15000, 20000 फार तर फार लाखभर रुपये. मात्र, अहमदनगरमधल्या पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात दोन तरुण महिन्याला तब्बल कोट्यवधी रुपये कमवतात. गरीबांच्या गाईनं त्यांना कोट्याधीश केलयं. (Inspirational stores of Earning money while staying in village)

अहमदनगरला दोन युवा शेतकऱ्यांनी 10 वर्षांपूर्वी सरकारी नोकरी सोडून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज वर्षाला तब्बल 12 कोटी 54 लाख रुपये कमवत आहेत.

शेळी पालनातून इतके पैसे कसे मिळतात?

शेळ्यांच्या विक्रीतून 12 कोटी, लेंडीखताच्या विक्रीतून 18 लाख, शेळीपालन कसं करावं हे शिकवण्याच्या मानधनापोटी 36 लाख रुपये इतके उत्पन्न या तरुणांना मिळते.

अशक्य वाटणार हे उत्पन्न दोन युवा शेतकरी मिळवत आहेत. राहुल खामकर आणि सतीश एडके. जिथं घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, त्या अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डीत कृषी सहाय्यक असणाऱ्या राहुल खामकरने सरकारी नोकरीला रामराम केला आणि मित्राच्या साथीनं मातीत उतरला.

20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू झाला. हळूहळू शेळ्या वाढल्या. एक-एक करत तेरा जातीच्या शेळ्या शेडमध्ये आल्या. तेरा जातींसाठी वेगवेगळी कंपार्टमेंट तयार केली. करडे, शेळ्या आणि बोकडांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. करडांची विक्री सुरू केली. आज फक्त आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्यांची ते विक्री करताय आणि त्यातनं ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत.

20 शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात, आज झालेय मोठी कंपनी

20 शेळ्यांपासून सुरू झालेल्या या व्यवसायाची आज कंपनी झालीयं. आज इथे तब्बल 750 शेळ्या आहेत. आणि सरासरी एक ते दीड हजार किलोच्या दरानं वर्षाकाठी तब्बल 4 हजार करडांची विक्री हे दोघे करतात. शेळीचं दूध लेंडीखत यांचीही विक्री होते. प्रयोगाच्या अनुभवातून प्रशिक्षणाकडे मोर्चा वळला आणि अतिरिक्त उत्पादनही मिळू लागले.

विशेष म्हणजे या शेळ्या आणि बोकडांची विक्री करण्यासाठी सतीश एडके यांच्या मुलगा प्रतीकने स्वतः सॉफ्टवेअर तयार करून मार्केटिंगला सुरुवात केली आहे.

सतीश आणि राहुल महिन्याला तब्बल 8 लाख रुपये मिळवतात. शहरात मोठ्या कंपनीत आणि मोठ्या पदावर काम करुनही इतकं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शहरात येवून करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पोरांनी जरा गावातल्या संधीकडेही पहावं.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!

एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद फक्त शेतीत, मंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉबेरीच्या शेतात

(Inspirational stores of Earning money while staying in village)

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.