Amol Khatal: ‘ज्यांना अजून दाढी-मिशा नाहीत…’, आमदार खताळ यांचा सत्यजित तांबेंवर निशाणा
दाढी मिशा नसलेल्यांनी मला राजकारण शिकवू नये असा टोला खताळ यांनी लागवला आहे. वाहतूक शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल खताळ हे बोलत होते.

MLA Amol Khatal Vs Satyajit Tambe: संगमनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत चाळीस वर्षानंतर सत्तानंतर झाले. तेव्हापासून तांबे – थोरात विरुद्ध खताळ संघर्ष अजूनही शमलेला नाही. दोन्ही नेत्यांमध्ये कधी श्रेयवादाची लढाई तर कधी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता अमोल खताळ यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
दोन दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी नगरपालिकेसाठी आणलेल्या स्वच्छता वाहनांची रॅली काढली. याच कार्यक्रमाचा धागा पकडत आमदार खताळ यांनी आमदार सत्यजित तांबे यांचेवर निशाना साधला आहे. मी दाढी असलेल्या नेत्याचाच चेला आहे त्यामुळे दाढी मिशा नसलेल्यांनी मला राजकारण शिकवू नये असा टोला खताळ यांनी लागवला आहे. वाहतूक शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल खताळ हे बोलत होते.
नेमकं काय म्हणालेत अमोल खताळ?
“दोन वर्ष आणि चाळीस वर्षाची तुलना संगमनेरकर दिसत आहेत. शिंदे साहेबांचा फोटो लावून लावायचा, महायुतीचा फोटो लावायचा अन् आम्ही आणले असे सांगायचं. संस्था तुझ्याकडे आहे, नगरपालिका तुझ्याकडे आहे. आणले ते संगमनेरकरासाठी आणले. हे मामाच्या कार्यालयाबाहेरची साफसफाई करायला तुम्हाला नव्हते दिले, असा टोला अमोल खताळ यांनी लगावला आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी मला उशिरा सांगितले. मला आधी सांगितले असते तर मी माझ्या पद्धतीने चांगला बंदोबस्त केला असता. त्यांना दाखवून दिले असते ही हा दाढीवाला सुद्धा दाढीवाल्या नेत्याचा चेला आहे. त्यामुळे ज्यांनाी अजून दाढी मिशा नाहीत त्यांनी मला राजकारण शिकवू नये, असं अमोल खताळ यावेळी म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्याचे राजकारण तुम्हाला लखलाभ. सहकाराचे राजकारण तुम्हाला लखलाभ. या नगरची स्वाभिमानी जनता अमोल खताळच्या पाठीशी आहे. असंही ते यावेळी म्हणाले. थोडक्यात संगमनेरमध्ये खताळ विरुद्ध सत्यजित तांबे- बाळासाहेब थोरात असा संघर्ष चांगलाच तापताना दिसत आहे.