AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalpana Kharat: कल्पना खरात सरेंडर होणार? अशोक खरातच्या फरार पत्नीविषयी मोठी अपडेट, उचलले सर्वात मोठे पाऊल

Kalpana Ashok Kharat Big Upadate: भोंदू खरातचे एक एक कारनामे पुढे येत असतानाच आता त्याची फरार पत्नी कल्पना खरातविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. ती सरेंडर होणार का? पोलिसांसमोर हजर होणार का? काय टाकले तिने मोठे पाऊल?

Kalpana Kharat: कल्पना खरात सरेंडर होणार? अशोक खरातच्या फरार पत्नीविषयी मोठी अपडेट, उचलले सर्वात मोठे पाऊल
कल्पना खरात Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 07, 2026 | 9:30 AM
Share

Kalpana Kharat Bail Application : भोंदू अशोक खरातचे सिंडिकेट मोठे आहे. त्याचे हवाल कनेक्शन, महिलांचे लैंगिक शोषण इथपासून ते राजकारण्यांमार्फत केलेली गुन्हेगारी कृत्य एकामागून एक पुढे येत आहे. त्याची अफाट संपत्ती, त्याने केलेल्या करानाम्याने राज्यच नाही तर देश हादरला आहे. एका खरातमुळे राज्याचे राजकारण पटकी खाऊ शकते असा दावा विरोधक करत आहेत. त्याच्या मुलाला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली होती. तर त्याची पत्नी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटली. ती अद्यापही फरार आहे. आता तिच्याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे.

कल्पना खरात हिची जामिनासाठी धावा धाव

अशोक खरात याच्या काळ्या करारनाम्याची इत्यंभूत माहिती कल्पना हिला होती. पण पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सवलतीचा फायदा तिने उठवलाच. ती आता अद्यात स्थळी आहे. तिला पळवण्यात कोणी मदत केली. तिचे खबरीलाल कोण हे लपून राहणार नाही. पण तिला राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा आरोपही विरोधक करत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना हे प्रकरण वाटते तितके सोपे नसल्याचे म्हटले आहे. येत्या काही आठवड्यात याविषयीचे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान कल्पना खरात ही पोलिसांसमोर सरेंडर करण्याची शक्यता धूसर दिसत आहे. तिने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. राहता न्यायालयात कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. हा अटकपूर्व जामीन अर्ज तिने 4 एप्रिल रोजी दाखल केला आहे.

10 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाऊ लागू नये आणि खरात प्रकरणात पोलिसांपासून संरक्षण मिळावे यासाठी कल्पना खरात ही अगोदरच गुप्त ठिकाणी पोहचली आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहचणार याची कुणकुण लागताच खरातची पत्नी यंत्रणांच्या हातावर तुरी ठेवत पळाली. आता तिने राहता न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 10 एप्रिल रोजी पहिली सुनावणी होणार आहे. तिला अटकपूर्व जामीन मिळाल्यास या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्यास पोलिसांना अडचणी येतील. तर तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यास भोंदू खरातच्या अडचणीत वाढतील. येत्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय नेत्यांना अभय?

दरम्यान खरात प्रकरणाचा तपास एका टप्प्यातच अडकल्याचे आणि राजकीय धागेदोरे शोधण्याचे काम थंडावल्याचा आरोपही विरोधक करत आहे. खरात प्रकरणात राजकीय नेत्यांचे नाव समोर येऊनही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी CDR पुढे आणूनही राजकीय नेत्यांना कुणाच्या आदेशाने अभय मिळत आहे असा सवाल विचारल्या जात आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?